Sunday, September 8, 2024
Home टेलिव्हिजन प्रेक्षकांच्या नजरेत तुमचा गेम ओव्हर झाला आहे! रितेशने सुनावले वैभवला खडे बोल…

प्रेक्षकांच्या नजरेत तुमचा गेम ओव्हर झाला आहे! रितेशने सुनावले वैभवला खडे बोल…

या आठवड्यात बिग बॉसच्या घरात कॅप्टन पदासाठी एक टास्क खेळवला गेला. या टास्क मध्ये अरबाज पटेल जिंकला आणि घराचा कॅप्टन झाला. या टास्क दरम्यान वैभव दुसर्या टीम मध्ये होता. पण त्याने अरबाजच्या टीमचं समर्थन यावेळी केलं. मात्र याच गोष्टीवरून आता रितेश देशमुख वैभवची शाळा घेणार असल्याचं बघायला मिळणार आहे. 

या आठवड्यातला भाऊच्या धक्क्याचा व्हिडीओ समोर आला आहे. यात रितेश देशमुख वैभवला रागावत असल्याचे दिसत आहे. रितेश वैभवला म्हणतो, आम्ही आतमध्ये वैभव पाठवलाय. गद्दार म्हणून बाहेर पडू नका. रितेश घरातल्या इतर सदस्यांना विचारतोय की, सीमेवरचा सैनिक समोरच्या सैनिकावर गोळ्या झाडण्यापेक्षा आपल्या सैनिकावर गोळ्या झाडतो याला काय म्हणतात ? त्यावर घरातले सदस्य म्हणतात, फितूर, गद्दार, धोकेबाज,  शत्रू असं म्हणत आहेत. 

रितेश नंतर वैभवला म्हणतो, बोलायला जिगर लागते, ही जिगर बाजारात प्रोटीनच्या डब्ब्यात मिळत नाही. ही जिगर तुमच्यात दिसत नाही. इथून पुढे तुमच्यावर कोणी का विश्वास ठेवायचा ? तुमच्या आत जे आहे तेच बाहेर दिसणार आहे.  प्रेक्षकांच्या नजरेत तुमचा गेम ओव्हर झाला आहे. आम्हाला देखील बघायचे आहे की ही मैत्री किती दिवस टिकते. आम्ही आतमध्ये वैभव पाठवला आहे. गद्दार म्हणून बाहेर पडू नका. 

या आठवड्यात कॅप्टन झाल्यामुळे अरबाज सेफ आहे. तर योगिता चव्हाण, निखिल दामले, अभिजित सावंत, सुरज चव्हाण हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. यांपैकी कोणत्या तरी एका सदस्याचा प्रवास लवकरच संपणार आहे. 

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा –  

स्त्री ने मारली बॉक्स ऑफिसवर बाजी ! भल्याभल्यांना टाकलं मागे…

   

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा