‘कुटुंब’हा आपल्या प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय. कुटुंबातील,नात्यागोत्यातील प्रत्येकाशी आपलं प्रेमाचं, स्नेहाचं एक वेगळं नातं असतं. मराठी चित्रपटांतूनही कौटुंबिक विषय अतिशय उत्तमतेने हाताळलेले आपण पाहतो. आंबे, सुपारी, केळी, फणसाच्या बागा, काजू, कोकमाची झाडं असा निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या कोकणाच्या पार्श्वभूमीवर घडणारी घरत कुटुंबाची मजेशीर गोष्ट आपल्याला आगामी ‘घरत गणपती’ या चित्रपटातून पहायला मिळणार आहे. मनोरंजन क्षेत्रात तडाखेबंद कलाकृतींनी आपलं वेगळं स्थान निर्माण करणारे पॅनोरमा स्टुडिओज सविनय सादर करत आहेत नॅविअन्स स्टुडिओ यांच्या सहकार्याने मराठी चित्रपट ‘घरत गणपती’. हा भव्य चित्रपट २६ जुलैला आपल्या भेटीला, आपल्या जवळच्या चित्रपटगृहात येत आहे.
नातेसंबंधातील प्रेम, गोडवा आपल्या सणांच्या माध्यमांतून अधिक दृढ होत असतो. मायेने आणि आपलेपणाने माणसं जोडणाऱ्या घरत कुटुंबातील ‘श्री गणराया’च्या आगमनाच्या वेळी घडणारी गमतीशीर गोष्ट चित्रपटात पहायला मिळणार आहे. अतिशय सुंदर कथाविषय, त्याला अभिनयसंपन्न कलाकारांची जोड यातून एक उत्तम कलाकृती दिग्दर्शक नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर आपल्यासमोर घेऊन येत आहेत. त्याआधी ‘घरत गणपती’ चित्रपटाचे आकर्षक पोस्टर आणि पहिली झलक आपल्यासमोर आली आहे.
निकिता दत्ता, भूषण प्रधान, अश्विनी भावे, अजिंक्य देव, संजय मोने, शुभांगी लाटकर, शुभांगी गोखले, डॉ.शरद भुताडिया, सुषमा देशपांडे, परी तेलंग,आशिष पाथोडे, रूपेश बने, राजसी भावे, समीर खांडेकर,दिव्यलक्ष्मी मैस्नाम अशी कलाकार मंडळी या चित्रपटात आहेत.
कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, नम्रता बांदिवडेकर, नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर, गौरी कालेलकर-चौधरी यांनी ‘घरत गणपती’ चित्रपटाची निर्मिती केली आहे.
‘प्रत्येक घरातली आणि घरातील प्रत्येकाची’ ही गोष्ट असून नातेसंबंधांचा सुरेख गोफ या चित्रपटात विणला आहे. जो प्रत्येकाच्या मनाला भावेल, त्यामुळेच पॅनोरमा स्टुडिओज ‘घरत गणपती’ चित्रपटाच्या सोबत भक्कमपणे उभे असल्याचे पॅनोरमा स्टुडिओजचे मॅनेजिंग डिरेक्टर कुमार मंगत पाठक यांनी सांगितले. नॅविअन्स स्टुडिओ निर्मित या चित्रपटाच्या वर्ल्ड वाइड वितरणाची जबाबदारी पॅनोरमा स्टुडिओजने सांभाळली आहे तसेच चित्रपटाच्या म्युझिकची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
तमन्ना भाटियाने दिले बेकायदेशीर स्ट्रीमिंग प्रकरणात समन्सला उत्तर, सायबर सेलकडून मागितला आणखी वेळ
या चित्रपटांनी बदलले कतरिनाचे करिअर; ती म्हणाली, ‘या क्षणांना मी आयुष्यातील अनमोल क्षण म्हणेन’