प्रसिद्ध टीव्ही मालिका ‘गुम है किसीके प्यार में’च्या अभिनेत्याने गुपचूप लग्न केले आहे. यश पंडित असे या अभिनेत्याचे नाव असून तो या मालिकेत पुलकितची भूमिका साकारत आहे. अभिनेत्याने त्याची दीर्घकाळाची गर्लफ्रेंड महिमा मिश्रासोबत सात फेरे घेतले, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
यश महिमा मिश्राचा शनिवारी (२२ जानेवारी) रात्री मुंबईतील जेडब्ल्यू मॅरियटमध्ये विवाह पार पडला. यशची बहीण आणि गायिका श्रद्धा पंडितने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत. याशिवाय यश पंडित यांच्या फॅनपेजवरून प्री-वेडिंग सेरेमनीपासून लग्नापर्यंतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत.
यश आणि महिमा यांचे लग्न खाजगी पद्धतीने पार पडले. यामध्ये केवळ कुटुंबातील सदस्य आणि त्यांचे काही जवळचे मित्र उपस्थित होते. यशने लग्नासाठी पांढरी शेरवानी आणि धोतर निवडले. त्यावर पारंपारिक लाल फेटा आणि लाल रंगाचा साफाही परिधान केला होता.
त्याचवेळी, वधू महिमा मिश्राने पारंपारिक लाल लेहेंगा निवडला आणि तिने त्यावर मॅचिंग चुनरी घेतली होती. त्यासह तिने हातात बांगड्या आणि जड गळ्यातले घातले होते. यशची बहीण आणि गायिका श्वेता पंडित हिने लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये, लग्नाच्या विधीदरम्यान यश पाहुण्यांसोबत फोटो काढताना आणि कॅमेरासमोर पोझ देताना दिसला.
यश आणि महिमाच्या प्री-वेडिंग सेरेमनीचे फोटो देखील समोर आले आहेत. ज्यात महिमा गोल्डन गाऊन घातलेली दिसत आहे. तर यश निळ्या ब्लेझर सूटमध्ये हँडसम दिसत आहे. यश आणि महिमाच्या या फोटोंमध्ये ‘गुम है किसी के प्यार में’ची इतर कोणतीही कलाकार दिसली नाही. मात्र या लग्नसोहळ्याला जॅकी श्रॉफ यांनी हजेरी लावली.
डिसेंबर २०२१ मध्ये उत्तर प्रदेशमध्ये या जोडप्याने साखरपुडा केला. साखरपुड्यानंतर यशने इंस्टाग्राम साखरपुड्याचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोसोबत एक सुंदर कॅप्शन लिहिले होते. यश पंडितने लिहिले होते की, “हे आहे जो उद्या येणार आहे आणि इथे माझे तुझ्यावर प्रेम आहे. हा क्षण आमच्या कुटुंबियांच्या आशीर्वादासह सामायिक करताना मला खूप आनंद होत आहे, तुमच्या प्रेमाची आणि प्रार्थनांची गरज आहे. साखरपुडा झाला.” यश आणि महिमा २०१५ मध्ये एका कॉमन फ्रेंडच्या बर्थडे पार्टीत भेटले होते. त्यांनी एकमेकांशी मैत्री केली आणि नंतर एकमेकांना डेट करायला सुरुवात केली.
हेही वाचा :
- रणवीर सिंग नाहीतर बॉलिवूडचा ‘सिंघम’ होता ‘बाजीराव मस्तानी’साठी निर्मात्याची पहिली आवड, पुढे झाले असे की…
- काय सांगता! दारू पिण्यासाठी गोविंदाने घेतली होती आईची परवानगी, वाचा हिरो नं १ चा भन्नाट किस्सा
- पुष्पा राजच्या स्टाईलने नेहा कक्करलाही लावले वेड, ‘ओ अंटावा’वर केला डान्स व्हिडिओ शेअर