Saturday, April 19, 2025
Home अन्य Happy Birthday : एक चूक पडली महागात आणि जिया मानेकला सोडावी लागली ‘साथ निभाना साथीया’ मालिका

Happy Birthday : एक चूक पडली महागात आणि जिया मानेकला सोडावी लागली ‘साथ निभाना साथीया’ मालिका

टेलिव्हिजनवरील ‘गोपी बहू’ म्हणजेच जिया मानेक एका मालिकेने रातोरात प्रसिद्ध झाली होती. तिला ‘गोपी बहू’ या नावानेच सगळे ओळखतात. अशातच शुक्रवारी (१८ फेब्रुवारी) जिया तिचा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्त जाणून घेऊया तिच्याबाबत काही खास गोष्टी…

जियाचा जन्म १८ फेब्रुवारी १९८६ मध्ये गुजरातमध्ये झाला. ती गुजराती कुटुंबातील आहे. आज सोशल मीडियावर तिचे अनेक चाहते तिला सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. तिने ‘साथ निभाना साथिया’ या लोकप्रिय मालिकेतून तिच्या करिअरला सुरुवात केली होती. (Giaa manek birthday special, she was removed from show dye to this reason)

साध्या भोळ्या गोपी बहूच्या रूपातील जिया सगळ्यांना खूप आवडली होती. परंतु तिला एक चूक चांगलीच भारी पडली होती. तिने २०१२ साली डान्स रिऍलिटी शो ‘झलक दिख ला’मध्ये भाग घेतला होता. :साथ निभाना साथीया’ या मालिकेच्या निर्मात्यांना तिने त्या शोमध्ये भाग घ्यावा असे वाटत नव्हते. परंतु तिने या शोमध्ये भाग घेतला. ही माहिती जेव्हा निर्मात्यांना समजली तेव्हा एका रात्रीतच त्यांनी जियाला या मालिकेतील काढून टाकले.

जियाने ‘झलक दिखला’ हा शो नाही जिंकला तसेच तिच्या हातात असलेली मालिका देखील गेली. त्यानंतर अनेक वर्ष ती दिसली नाही. ती २०१९ रोजी ‘मनमोहिनी’ या मालिकेत दिसली होती. आता ती ‘तेरा मेरा साथ’ मालिकेत मुख्य भूमिकेत आहे. तसेच तिने याआधी ‘ना घर के ना घाट के’ या चित्रपटात देखील काम केले आहे.

एप्रिल २०१२ मध्ये जिया मनेक एक फेमस हुक्का रेस्टॉरंटमध्ये तिची आज आणि मित्रांसोबत गेली होती. तिथे पोलिसांची रेड पडली होती. परंतु यातून ती वाचली होती.

‘साथ निभाना साथीया’ मालिकेतून बाहेर काढल्यावर तिला ‘बिग बॉस १३’साठी अप्रोच केले होते. परंतु नंतर तिच्या जागेवर रुबीना दिलैक आणि अभिनव शुक्ला यांना या शोमध्ये घेण्यात आले.

हेही वाचा :

हे देखील वाचा