×

इतकी बदललीय ‘हम आप है कौन’ची ‘रीटा’, फोटो पाहून ओळखणेही झाले कठीण

हिंदी चित्रपटसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रचंड लोकप्रियता मिळवली. मात्र काही काळाने त्या चित्रपट जगतातून जणू गायबच झाल्या. याच अभिनेत्रींमध्ये नाव घेतले जाते ते साहिला चड्डा (Sahila Chadha). काय आहे साहिलाच्या आयुष्याची कहाणी चला जाणून घेऊ…

अभिनेत्री साहिला चड्डा ही ९०च्या दशकातील आघाडीची अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध होती. तिने पन्नासपेक्षा जास्त चित्रपटात काम केले यामध्ये सलमान खानसोबतही तिने भूमिका साकारल्या आहेत. मात्र इतक्या चित्रपटात काम करूनही आणि इतकी लोकप्रिय होऊनही ती पुन्हा चित्रपटात काम करायची कमी झाली. अभिनेत्री साहिला चड्डाने मिस वर्ल्डचा किताब सुद्धा आपल्या नावावर केला होता.

View this post on Instagram

A post shared by Sahila Chaddha (@sahilachaddha)

म्हणतात ना कितीही मेहनत घेतली तरी शेवटी नशिबाचीसुद्धा साथ लागते. साहिलाच्या बाबतही असेच काहीतरी झाले. तिचे वडीलसुद्धा चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध दिग्दर्शक होते. मात्र साहिला लहान असतानाच तिच्या वडिलांचे दुःखद निधन झाले. त्यामुळे लहानपणीच तिच्यावर मोठी जबाबदारी पडली. साहिला लहानपणापासूनच अत्यंत हुशार होती. तिने खूप कमी वयात मॉडेलिंग करायला सुरुवात केली. मिस वर्ल्डचा किताब मिळवण्याआधी तिने अनेक मानाचे पुरस्कार पटकावले होते.

View this post on Instagram

A post shared by Sahila Chaddha (@sahilachaddha)

साहिलाने ‘शीला’ चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्याकाळातील सगळया दिग्गज अभिनेत्यांसोबत तिने काम केले. ज्यामध्ये जॉकी श्रॉफ, मिथुन चक्रवर्ती, सलमान खान आणि शाहरुख खान यांचा समावेश होता. अभिनेता सलमान खानसोबत तिने ‘हम आपके है कौन’ या चित्रपटात रीटाची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील तिच्या कामाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले होते. समोर आलेल्या बातमीनुसार साहिला सध्या स्वतःचे एक प्रॉडक्शन हाऊस चालवते.

हेही वाचा –

Latest Post