Wednesday, January 15, 2025
Home मराठी ‘माझा प्रतिस्पर्धी मीच’ म्हणत अभिनेते गिरीश ओक यांनी शेअर केलेली ‘ती’ पोस्ट आली चर्चेत

‘माझा प्रतिस्पर्धी मीच’ म्हणत अभिनेते गिरीश ओक यांनी शेअर केलेली ‘ती’ पोस्ट आली चर्चेत

मराठी मनोरंजनविश्वातील दिग्गज अभिनेते गिरीश ओक यांना कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज आणि. आपल्या उत्तम आणि प्रभावी अभिनयाने त्यांनी स्वतःचे एक वेगळे स्थान या क्षेत्रात निर्माण केले आहे. डॉक्टर असूनही त्यांनी अभिनयात पदार्पण केले आणि यश मिळवले. नाटकं, मालिका आणि चित्रपट अशा मनोरंजनाच्या सर्वच माध्यमांमध्ये त्यांनी त्यांचा एक ठसा उमटवला आहे. ‘अग्गबाई सासूबाई’ या मालिकेनंतर तर त्यांची लोकप्रियता आसमंताला पोहचली आहे.

गिरीश ओक हे सोशल मीडियावर देखील बऱ्यापैकी सक्रिय आहेत. ते नेहमीच त्याच्या कामाशी निगडित वैयक्तिक अशा अनेक पोस्ट शेअर करताना दिसतात. नुकताच एका पुरस्कार सोहळ्यामध्ये गिरीश ओक यांना नाटकासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार मिळाला आहे. पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांचा आनंद आणि त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

गिरीश ओक यांनी त्यांच्या पोस्टमध्ये त्या पुरस्कार सोहळ्यातील व्यावसायिक नाटकांसाठी नामांकन असलेल्या कलाकारांच्या नावांचा एक फोटो आणि त्यांचा पुरस्कार मिळल्यानंतरचा एक फोटो शेअर केला आहे. सोबतच त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, “माझा प्रतिस्पर्धी मीच, असं इतर कोणाच्या बाबतीत झालंय की नाही मला माहीत नाही पण माझ्याबाबतीत तरी पहिल्यांदा झालं. सध्या माझी दोन नाटकं सुरू आहेत “३८ कृष्ण व्हिला” आणि “काळी राणी”. झी नाट्यगौरवला या दोन्ही नाटकांसाठी सर्वोत्कृष्ठ अभिनेता म्हणून मला नामांकन मिळालं.”

पुढे गिरीश ओक लिहितात, “दोन विरुध्द टोकाच्या भूमिका माझ्या माध्यमातून एकमेकींसमोर उभ्या ठाकल्या आणि काल चक्क दोन्ही भूमिकांना सर्वोत्कृष्ठ अभिनेता म्हणून पुरस्कार मिळाला. मला कळंतच नाहिये मी माझ्या कुठल्या भूमिकेचं अभिनंदन करू ते. आता तुम्हीही विचाराल तुम्हाला कोणत्या भूमिकेसाठी हवं होतं ? पण असं नाही ना सांगता येत. एकीचं नाव घेतलं तर दुसरी माझ्यावर नाराज होणार आणि मलाच दोन्ही भूमिकांचे अजून खूप प्रयोग करायचे आहेत. “३८” चे १२५ होत आले आहेत आणि “राणी” चे ५० फक्त.”

दरम्यान गिरीश ओक यांनी टीव्हीवर ‘ह्या गोजिरवाण्या घरात’, ‘पसंत आहे मुलगी’, ‘आराधना’, ‘पिंजरा’, ‘अग्निहोत्र’, ‘या सुखांनो या’, ‘अधुरी एक कहाणी’, ‘अवंतिका’, ‘निवडुंग’, ‘दामिनी’ ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘अगंबाई सासूबाई’ या मालिकांमध्ये काम केले आहे. तर ‘ज्याचा त्याचा प्रश्न’, ‘सुंदर मी होणार’, ‘अभिनेत्री’, ‘सुखांशी भांडतो आम्ही’, ‘श्री तशी सौ’, ‘लव्हबर्ड्स’, ‘मी बाई सहावारी’, ‘यु टर्न’, ‘ती फुलराणी’ ही नाटकं आणि ‘जसा बाप तशी पोरं’, ‘वाट पाहते पुनवेची’, ‘शिवरायांची सून ताराराणी’, ‘लावण्यवती’, ‘विश्वविनायक’, ‘सातच्या आत घरात’, ‘झुळूक’, ‘आम्ही असू लाडके’, ‘माझा नवरा तुझी बायको’, ‘तानी’ आदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र गिरीश ओक हे जास्त नाटकांमध्ये रमताना दिसतात.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांचा झाला ‘रहस्यमयी’ मृत्यू घरात कुजलेल्या अवस्थेत सापडला होता मृतदेह

‘आदिपुरुषला बॉयकॉट करा’ म्हणत नेटकऱ्यांनी चित्रपटाच्या नव्या पोस्टरवरील ‘त्या’ चुकीवर घेतला आक्षेप

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा