पात्राची ताकदची अशी होती की कंस झालेल्या ‘त्या’ कलाकाराला लोकं समजू लागले होते खलनायक


गोगा कपूर हे 80 आणि 90 व्या शतकातील अनेक सुपरहिट हिंदी चित्रपटांचा भाग होते. कदाचित त्यांना कोणी त्यांच्या नावाने ओळखत नसेल, पण ‘बी. आर. चोप्रा’ यांच्या महाभारत यामध्ये नक्कीच पाहिले असेल. महाभारतामध्ये त्यांनी श्रीकृष्ण यांच्या मामाची म्हणजे कंस मामाची भूमिका साकारली होती. त्याच्या या पात्राला प्रेक्षकांकडून एवढी लोकप्रियता मिळाली की, सगळेजण त्यांना त्यांच्या आयुष्यात देखील कंस समजायला लागले होते. आज त्यांची पुण्यतिथी आहे, तर जाऊन घेऊया त्यांच्या आयुष्यातील काही खास गोष्टी.

गोगा कपूर यांचे खरे नाव हे ‘रविंदर कपूर’ हे आहे. त्यांचा जन्म 15 डिसेंबर 1940 मध्ये झाला आणि 2 मार्च 2011 रोजी ते मृत्यू पावले. त्यांनी 500 हुन अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘कयामत से कयामत तक’ यामधील त्यांच्या पात्राला खूपच लोकप्रियता मिळाली.

गोगा कपूर यांनी 1971 मध्ये ‘जलवा’ या चित्रपटातून आपल्या चित्रपट क्षेत्रातील करीअरला सुरूवात केली. सुरुवातीच्या दिवसांमध्ये त्यांनी अनेक इंग्लिश प्लेमध्ये देखील काम केले. त्यानंतर थिएटरमध्ये त्यांची ‘महरथ’ बघितल्यानंतर चित्रपट सृष्टीतील त्यांना चित्रपटासाठी बोलावणे आले. गोगा कपूर यांनी अनेक वेळा खलनायकाची भूमिका निभावली होती.

महाभारतात काम केल्यानंतर सगळे प्रेक्षक त्यांना कंस मामा म्हणूनच ओळखू लागले. महाभारत या कार्यक्रमाने अनेक कलाकारांचे आयुष्य बदलले होते. त्यामधील एक म्हणजे गोगा कपूर.

ते जिथे कुठे जातील तिथे त्यांना एकच प्रश्न. विचारलं जाई की, ते त्यांची बहिण देवकी सोबत एवढा अत्याचार का करतात? या पात्राला प्रेक्षकांनी अगदी मनापासून स्वीकारले आहे, याची ही पोचपावती होती. त्यांनी गंगा जमुना सरस्वती, कयामत से कयामत तक, सागर, अग्निपथ, मर्द यांसारख्या सुपरहिट चित्रपटामध्ये काम केले आहे. मनमोहन देसाई यांच्या ‘तुफान’ या चित्रपटात डाकू सैतान सिंह हे खलनायक पात्र निभावलं होत. त्यांचं हे पात्र खूपच भयानक होत.


Leave A Reply

Your email address will not be published.