Monday, June 24, 2024

नुसता राडा! गोल्डन ग्लोब अवॉर्ड 2023 मध्येही ‘आरआरआर’नेच जिंकला खिताब

दक्षिणमधील यावर्षी अनेक गाजणाऱ्या चित्रपटांनी प्रेक्षकांना भेट दिली होती. मात्र, एसएस राजामौली दिग्दर्शित आरआरआर चित्रपटाने तर क्रजेच मिळवली आहे. चित्रपटातील गाणी, दिग्दर्शन, आणि कलाकारांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे, त्याशिवाय आरआरआर चित्रपटामधील ‘नाटु नाटु‘ हे गाणं तुफान गाजलं असून या गाण्याला ऑस्कर नामांकणासाठी देखिल निवड केली आहे. अशातच या गाण्याचे ‘गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स 2023’ चा अवॉर्ड देखिल आपल्या नावावर केला आहे.

एसएस राजामौली (S. S. Rajamouli) दिग्दर्शित आरआरआर (RRR) चित्रटाने भारतातच नाही तर परदेशताही छप्परतोड कमाइ केली आहे. त्याशिवाय चित्रपटचं ऑस्करमध्येही नाव गाजत आहे. अशातच आरआरआर मधील ‘नाटु नाटु’ या गाण्याला गोल्डन ग्लोब अवॉर्डमध्ये बेस्ट ओरिजनल सॉंग साठी सन्मानित केलं आहे. चित्रपटाच्या यशानंतर साउथ इंडस्ट्रीचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

नुकतंच 80 व्या गोल्डन ग्लोब अवॉर्ड 2023 (80th Golden Globe Awards 2023)  थाटामाटात पार पडला असून साउथमधील अनेक कलाकरांनी या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली होती. त्याशिवाय आरआरआर ब्लॉकबस्टर चित्रपटामधील नाटुनाटु गाण्याला बेस्ट ओरिजनल सॉंग अवॉर्ड मिळाला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या आरआरआर चित्रपटाची चर्चा सुरु आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी या गाण्याच्या यशासाठी आनंद व्यक्त केला आहे. राम चरण (Ram Charan) आणि ज्युनिअर एनटीआर (N. T. Rama Rao Jr.) चित्रपटाच्या सक्सेसमुळे यांचाही आनंद गगनात मावेनासा झाला आहे. यांनी देखिल सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपला आनंद व्यक्त केला आहे. त्यासोबतच अभिनेत्री कियारा अडवानी (Kiara Advani) हिने राम चरणच्या पोस्टवर कमेंट करत आनंद व्यक्त करत शुभेच्छा दिल्या आहेत.

साउथ इंडस्ट्री सोबतच बॉलिवूड कलाकरही खूपच आनंदी असून त्यांनी देखिल सोशल मीडियावर पोस्ट शेअर आरआरआर चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्याशिवाय चित्रपटाचे आणि दिग्दर्शकाचे देखिल तोंडभरुन कौतुक होत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
विराट कोहलीने श्रीलंकेविरोधात शतक झळकवल्यानंतर आनंद व्यक्त करताना केली रोमॅंटिक पोस्ट शेअर
‘…परिस्थितीचा सामना केलाच पाहिजे’, म्हणत कॅन्सरग्रस्त अभिनेत्री छवी मित्तलने दिली तिच्या तब्येतीची माहिती

हे देखील वाचा