Saturday, April 20, 2024

Bye Bye 2021: ‘या’ आहेत २०२१मधील सर्वात लोकप्रिय कोरियन सीरिज, सुपरहिट ‘स्क्विड गेम’चाही समावेश

कोरियन चित्रपटाचा प्रकार हळूहळू आता संपूर्ण जगभरात लोकप्रिय होत चालला आहे. सगळे जग आता नेटफ्लिक्सवर आलेल्या स्क्विड गेमबद्दल बोलत आहेत. अशा काही कोरियन सीरिज आहेत,‌ ज्यांनी सगळ्या जगाचे लक्ष त्यांच्याकडे वेधून घेतले आहे. चला तर २०२१ च्या शेवटी जाणून घेऊया या वर्षातील स्क्विड गेमपासून ते हेलबाऊंडपर्यंत लोकप्रिय असलेल्या वेबसीरिज…

स्क्विड गेम:
२०२१ मध्ये आलेली सक्विड गेमने नेटफ्लीक्सचे सगळे रेकॉर्ड तोडून टाकले होते. या सीरिजचा एवढा परिणाम झाला की, सीरिजचा शेअर मार्केटपासून ते ऑनलाईन मार्केटपर्यंत परिणाम दिसून आला. (Good bye 2021 from squid game to hometown best korean series)

हेलबाउंड:
१९ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेली ही कोरियन सीरिजने लोकांना अक्षरशः वेड लावले होते. ही कहाणी एका विद्यार्थ्याची आहे. जो कोणत्या तरी कारणाने अपराधाच्या दुनियेत पाऊल ठेवतो. परंतु त्याचे हे रहस्य त्याच्यासोबत असणाऱ्या लोकांना समजते. नेटफ्लिक्सवरील ही सीरिज खूप चर्चेत राहिली आहे. लोकांनी देखील ही सीरिज खूप आवडली होती.

माय नेम:
कोरियन क्राईम थ्रिलर ‘मायनेम’ या सीरिजने देखील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. ही कहाणी एक तरुण मुलाची आहे. ज्याच्या वडिलांचा मृत्यू झालेला असतो आणि त्याचा बदला घेण्यासाठी तो प्रयत्न करत असतो.

विन्संझो:
नेटफ्लिक्सवरील या सीरिजला बेस्ट ड्रामा सीरिजचा अवॉर्ड मिळाला. यामधील कलाकारांची केमिस्ट्री सगळ्यांना खूप आवडली आहे.

लव्ह अलार्म २:
तब्बल चार वर्षानंतर या सीरिजचा दुसरा सिझन आला आहे. यात लव्ह ट्रँगल दाखवला आहे. प्रेक्षकांना देखील सीरिज खूप आवडली.

होम टाऊन चाचाचा:
ही सीरिज एक रोमँटिक कोरियन ड्रामा आहे. ही दाक्षिणात्य कोरियन चित्रपट मिस्टर हाँग (२००४) चा रिमेक आहे.

नेवर्थलेस:
ही सीरिज कॉलेजच्या दोन विद्यार्थ्याच्या आयुष्यावर आधारित आहे. ज्यांना एका सिरियस रिलेशनशिपपासून लांब राहायचे असते. परंतु हे करताना ते एकमेकांकडे आकर्षित होतात.

हेही वाचा :

हे देखील वाचा