Friday, December 27, 2024
[aioseo_breadcrumbs]

न्यू जर्सीमध्ये फॅनने लावला होता बिग बींचा पुतळा, गुगल मॅपमध्ये सापडली ही खास जागा

बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना भारतीय चित्रपटसृष्टीत ओळखीची गरज नाही. ७० च्या दशकात आपल्या अभिनयाच्या जोरावर कोट्यावधी प्रेक्षकांच्या मनावर त्यांनी एकहाती अधिराज्य गाजवले आहे. त्यांच्या कामाचे असंख्य चाहते आहेत मग ते त्यांचे चित्रपट असोत किंवा क्विझ शो कौन बनेगा करोडपती, बिग बी यांनी जगभरात प्रेक्षकांवर आपली मोहिनी घातली आहे. याच प्रेमापोटी न्यू यॉर्क येथील त्यांच्या एका चाहत्याने आपल्या घरासमोर बच्चन यांचा पुतळा स्थापन केला आहे. गुगल मॅपवर त्यांचा पुतळा पर्यटकांचे आकर्षण म्हणून ओळखला जात आहे.

ऑगस्ट २०२२ मध्ये, गोपी सेठ यांनी न्यू यॉर्कच्या मॅनहॅटनच्या दक्षिणेला सुमारे ३५ किलोमीटर अंतरावर असलेल्या एडिसन सिटीमधील त्यांच्या घराबाहेर अमिताभ बच्चन यांचा पुतळा स्थापित केला. या पुतळ्यामुळे गोपीचे घर एक प्रसिद्ध पर्यटन केंद्र बनले आहे, जे आता गुगल सर्चद्वारे ओळखले जात आहे.

या वर्षी फेब्रुवारीमध्ये गोपी शेठ यांनी पुतळ्याचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता आणि त्यात लिहिले की, “माझे आदर्श असलेले अमिताभ बच्चन यांचा हा पुतळा, न्यू जर्सीमधील पर्यटकांचे आकर्षण बनला आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले कि, हा माझा त्यांना एक ट्रिब्युट आहे. ते सर्वकालीन महान अभिनेते आहेत.”अमिताभ बच्चन यांच्या पुतळ्यामुळे आमचे घर हे सर्वात लोकप्रिय पर्यटन केंद्र बनले आहे कारण गुगल सर्चद्वारे ओळखल्या जाणाऱ्या या स्थळावर दररोज मोठ्या संख्येने लोक येतात.” ”

ते म्हणाले की, जगभरातून अनेक चाहते बिग बीं चा पुतळा पाहण्यासाठी येतात आणि दररोज २० ते २५ कुटुंबे सरासरी येतात.अमिताभ बच्चन यांचे कौतुक करणारे ग्रीटिंग कार्ड आणि पत्रे लोक इथे सोडतात. काही चाहत्यांच्या आगमनाचा व्हिडिओ गोपी सेठ यांनी शेअर केला आहे. “आमचे घर अमिताभ बच्चन यांचा जागतिक प्रभाव प्रतिबिंबित करते असे गोपी म्हणतात ” तसेच जगभरातील चाहत्यांचे या स्थळावर स्वागत करताना त्यांना अभिमान वाटतो.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

नव्या स्तरावरील धोक्यांसाठी तयार राहा …. खतरोंके खिलाडी मध्ये हे असतील नवीन चेहरे
वर्षा उसगांवकर, कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर ते गुलीगत सूरज चव्हाण; कोण आहे ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनमधील 16 सदस्य?

हे देखील वाचा