Wednesday, December 6, 2023

रेणुका शहाणेंनी समोर आणली बॉलिवूडची दुसरी बाजू; म्हणाली, ‘मी वाईट अभिनेत्री…’

मराठी आणि हिंदी सिनेसष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रेणुका शहाणे हिने आपल्या अभिनयाने आणि साैंदर्याने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. रेणुकाच्या अभिनयाने कायमच सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. अशातच रेणुका सध्या तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. रेणुकाचा लाखाे संख्येत चाहतावर्ग असला तरी अनेकदा तिला ऑडिशनमध्ये नकारांचा सामना करावा लागतो. असा धक्कदायक खुलासा अभिनेत्रीनं अलीकडेच एका मुलाखतीत केला आहे. 

अभिनेत्री रेणुकाने ‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटात विकी कौशलच्या आईची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात रेणुकाचे अनाेखे रुप पाहायला मिळत आहे. सध्या या चित्रपटाच्या प्रमाेशन निमित्त अभिनेत्री अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी हाेत आहेत. अशातच अभिनेत्रीनं एका मुलाखतीदरम्यान आजकाल चित्रपटासाठी होणाऱ्या कास्टिंगच्या प्रक्रियेबद्दल भाष्य केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amey Wagh (@ameyzone)

एका मुलाखतीदरम्यान अभिनेत्रीनं सांगितले की, “मला अनेकदा ऑडिशननंतर नकार मिळाला आहे. मला माझ्या दिग्दर्शकाकडून माझी व्यक्तिरेखा समजून घ्यायची आहे, पण आजकाल हे काम कास्टिंग डायरेक्टरचे सहाय्यक करतात. त्यामुळे मला ही पद्धतच समजत नाही आणि ऑडिशनमध्ये मला नकार दिला जातो.”

अभिनेत्री रेणुका पुढे म्हणते, “मी ऑडिशनमध्ये शंभर टक्के देऊ शकत नाही, पण मी नकारही तितक्या गांभीर्याने घेत नाही. तसेच मी वाईट अभिनेत्री आहे असे मला वाटत नाही. मी एक दिग्दर्शक देखील आहे आणि मला वेगवेगळ्या प्रकारचे कलाकार मिळतात. मात्र, ऑडिशनमधून नकारा मिळाला याचा अर्थ माझा अभिनय चांगला नाही असं नाही, फक्त मी त्या भूमिकेच्या जवळ जाऊ शकत नाहीत.”

रेणुका शहाणे हिच्या अभिनय काराकिर्दी विषयी बाेलायचे झाले, तर तिने ‘हम आपके है काेण’, ‘बकेट लिस्ट’, ‘फर्स्ट सेकंड चान्स’ यासारखे दमदार चित्रपट सिनेसृष्टीला दिली. (bollywood actre`s`s renuka shahane reveals often gets rejected at auditions she does not understand process of casting directors)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘माझी मुलं मुस्लिम हाेणार की हिंदू…’, जिम ट्रेनरशी लग्न केल्यानंतर अभिनेत्री ट्राेल, देवाेलिनानं दिलं चाेख उत्तर

कार्तिक आर्यनने फीफा विश्वचषकासाठी घेतली भरारी, कतारमध्ये ‘हे’ कलाकारही लुटणार सामन्याचा आनंद

हे देखील वाचा