Saturday, January 25, 2025
Home बॉलीवूड गोविंदाच्या पत्नीने सांगितली तिच्या मनातली इच्छा! म्हणाली, ‘काश माझा देखील…’

गोविंदाच्या पत्नीने सांगितली तिच्या मनातली इच्छा! म्हणाली, ‘काश माझा देखील…’

गोविंदा हिंदी सिनेमातील एक असा अभिनेता ज्याच्या नावावरच सिनेमे हिट व्हायचे. ९० आणि २००० च्या काळात गोविंदाने मोठ्या पडद्यावर अक्षरशः आग लावली होती. गोविंदाचा डान्स, त्याची कॉमेडी, ऍक्शन, एक्सप्रेशन आदी गोष्टींवर प्रेक्षक जीव ओवाळून टाकायचे. थोडक्यात सांगायचे, तर गोविंदा म्हणजे ऑल इन वन स्वरूपाचा अभिनेता आहे. आजच्या तरुणांना गोविंदासारखा डान्स आणि त्याचासारखा अभिनय शिकून सुद्धा करता येणार नाही. तो एकमेव आहे. सध्या जरी गोविंदा मोठ्या पडद्यावर कमी दिसत असला, तरीही तो छोट्या पडद्यावर बऱ्याच वेगवेगळ्या शोमध्ये हजेरी लावताना दिसत असतो.

नुकताच गोविंदा झी टीव्हीच्या ‘इंडियन प्रो म्युझिक लीग’ कार्यक्रमात पत्नी आणि मुलीसोबत पोहोचला होता. या कार्यक्रमात त्याने आणि स्पर्धकांनी भरपूर धमाल केली. गोविंदाने या शोमध्ये त्याच्या अनेक हिट गाण्यांवर दमदार परफॉर्मन्स देत सर्वांची मने जिंकली. या शोमध्ये एका व्हिडिओच्या माध्यमातून गोविंदाची बहीण, मित्र आणि सहाय्यक कलाकारांनी गोविंदांबद्दल गौरवोद्गार काढले. त्याच्यासोबतचे अनेक किस्से आणि आठवणी त्यांनी सर्वाना सांगितले.

हा व्हिडिओ पाहून गोविंदा अतिशय भावुक झाला आणि म्हणाला, “या व्हिडिओसाठी सर्वांचे खूप आभार. हा व्हिडिओपाहून मला माझ्या खूप जुन्या आठवणी आता आठवत आहे. खूप कमी लोकांना त्यांच्या आयुष्यात आई- वडिलांची सेवा करण्याची संधी मिळते. मी खूपच नशीबवान ठरलो की मला ही संधी मिळाली. मला अजूनही आठवते की, माझी आई रोज आमच्यासाठी गाणी गायची आणि तिच्या सुरेल आवाजाने आमच्या रोजच्या दिवसाची सुरुवात व्हायची.”

गोविंदा त्याच्या आईबद्दल बोलताना म्हणाला, “लोकं नेहमी माझ्या आईला विचारायचे की तुम्ही एवढ्या प्रार्थना का करतात? मात्र, मला माहित आहे आमचे स्वप्न होते की, एक घर घेण्यासाठी आणि यशस्वी होण्यामागे माझ्या आईचीच मेहनत आणि आशीर्वाद आहे. मी कधीच विचार केला नव्हता की, मी राहत असलेल्या चाळीतून बाहेर येईल. पण असे झाले हे फक्त माझ्या आईने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे.”

पुढे गोविंदाच्या पत्नीने सुनीताने सांगितले की, “आमच्या लग्नाला ३६ वर्ष झाले. अनेक चढ उतारांचा आम्ही दोघांनी मिळून सामना केला. मी गोविंदाला एक चांगला भाऊ, आदर्श मुलगा, चांगला पिता आणि चांगला पती अशा विविध रूपात पाहिले. त्याने जशी त्याच्या आई-वडिलांची काळजी घेतले. ते पाहून मला नेहमीच त्याच्यासारखा मुलगा असावा असे वाटत असते.”

गोविंदाला दोन अपत्य आहेत. त्यातील मुलीचे नाव टीना आहुजा आणि मुलाचे नाव हर्षवर्धन आहुजा असे आहे. टीनाने ‘सेकंड हँड हस्बंड’ या चित्रपटात काम केले होते. यामध्ये तिच्यासोबत धर्मेंद्र, गीता बसरा, गिप्पी ग्रेवाल यांसारख्या दिग्गज कलाकारांची भूमिका होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-फ्लॉप ऍक्टर ठरूनही रॉयल जीवन जगतोय अभिनेता आफताब; तर वयाच्या ३८व्या वर्षी दुसऱ्यांदा अडकला लग्नगाठीत

-केरळ हायकोर्टाकडून चित्रपट निर्माती आयशा सुल्तानाला अटकपूर्व जामीन मंजूर; भाजप नेत्याविरुद्ध केले होते वक्तव्य

-कपूर घराण्याचे नियम तोडत करिश्माने केले होते अभिनयात पदार्पण; वाचा अभिनेत्रीबद्दल कधीही न ऐकलेल्या गोष्टी

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा