Saturday, December 14, 2024
[aioseo_breadcrumbs]

खूपच बदललीय ‘लगान’ सिनेमातील ग्रेसी सिंग; २० वर्षांनंतर अशी दिसतेय आमिर खानची अभिनेत्री

ते म्हणतात ना हाताची पाचही बोटं सारखी नसतात, अगदी त्याप्रमाणेच आयुष्यात देखील यश- अपयश मिळतच असते. एकदा मिळणारे यश हे कायम स्वरूपी टिकेल, असे बिल्कुल नाही आणि येणारे अपयशही नेहमी टिकत नाही. आपल्या सामान्य आयुष्यात हा नियम लागू होतच असतो. मात्र, ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये देखील हे नियम लागू आहेत. कलाकारांच्या बाबतीतही असे घडताना आपण अनेकदा पाहतो, ऐकतो. हिंदी चित्रपटसृष्टीमध्येही अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या जेव्हा इंडस्ट्रीमध्ये आल्या, तेव्हा पदार्पणातच त्यांनी अमाप यश मिळवले. मात्र, त्यानंतर त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. यातीलच एक नाव म्हणजे ग्रेसी सिंग.

होय, लगान सिनेमातील ‘गौरी’ म्हणजेच अभिनेत्री ग्रेसी सिंग. टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधून चित्रपटांमध्ये आलेल्या ग्रेसी सिंगने तिच्या पहिल्याच सिनेमात तुफान यश आणि लोकप्रियता मिळाली. पहिल्याच सिनेमात तिनी ‘मिस्टर पर्फेक्शनिस्ट’ आमिर खानसोबत काम केले. त्यानंतर तिला चांगले मोठे यश न मिळाल्याने तिने आपला मोर्चा पुन्हा टेलिव्हिजन क्षेत्राकडे वळवला. मागच्या अनेक दिवसांपासून गायब असणाऱ्या ग्रेसी सिंगने नुकतेच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे काही सुंदर असे साडीतले फोटो पोस्ट केले आहेत. लगान सिनेमाच्या २० वर्षांनंतर ग्रेसी खूपच बदलली आहे. तिच्या या फोटोंमुळे ती आता अचानक प्रकाशझोतात आली आहे.

ग्रेसीचे मरून रंगाच्या साडीतले आकर्षक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. तिचे लांब सडक आणि मोकळे केस तिच्या सौंदर्याला चार चाँद लावत आहेत. तिचे हे फोटो एखाद्या सेटवरचे वाटत आहेत. त्यामुळे ग्रेसी पुन्हा मालिका किंवा चित्रपटांमध्ये कमबॅक करणार का असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. ग्रेसी जर कमबॅक करणार असेल, तर तिच्या फॅन्ससाठी ही एक आनंदाची बातमी ठरेल.

पहिल्या सिनेमाच्या यशानंतर ग्रेसी सिंग अनेक सिनेमात दिसली. मात्र, त्यांना पाहिजे तसे यश मिळाले नाही. त्यानंतर काही वर्षांपूर्वी तिने संतोषी माता ही भूमिका निभावत पुन्हा टीव्ही इंडस्ट्रीमध्ये काम केले होते. ‘गंगाजल’, ‘मुन्ना भाई एमबीबीएस’, ‘अरमान’ आदी सिनेमांमध्ये काम केले आहे. आता ग्रेसी पुन्हा कोणत्या नव्या भूमिकेत दिसणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बंगाली ब्युटी’ मौनी रॉयने केले बेडरूममधील फोटो शेअर; कातिलाना अंदाजाने चाहते घायाळ

-‘पितृदिना’निमित्त अभिनेता आयुषमान खुरानाची भावुक पोस्ट; आपल्या नावाशी संबंधित सिक्रेटचाही केला खुलासा

-‘बापमाणूस!’, ‘पितृदिना’निमित्त सिद्धूची खास पोस्ट आली समोर; होतोय प्रेमाचा वर्षाव

हे देखील वाचा