Monday, June 17, 2024

किरण मानेला मालिकेतून काढल्याने ‘मुलगी झाली हो’ मालिकेचे मोठे नुकसान, गावकऱ्यांनी आणली शूटिंगवर बंदी

सध्या टेलिव्हिजनवरील ‘मुलगी झाली हो’ मालिका चांगलीच चर्चेत आली आहे. खरंतर मालिकेत कोणतेही वळण, कोणताही सकारात्मक बदल झालेला नसून मालिकेतील एका कलाकाराला मालिकेतून काढण्यात आले आहे. अभिनेता किरण माने याला मालिकेतून काढण्यात आले आहे. सोशल मीडियावर त्याने राजकीय भूमिका घेतल्याने त्याला या मालिकेतून काढण्यात आले आहे, अशी चर्चा चालू आहे.

सोशल मीडियावर त्याचे चाहते, कलाकार तसेच राजकीय नेते या गोष्टीवर संताप व्यक्त करत आहेत. अनेकांना हा निर्णय पटला नाहीये. सोशल मीडियावर सर्वत्र या गोष्टीची चर्चा चालू आहे. निर्मात्यांच्या या निर्णयामुळे प्रेक्षक नाराज आहेत. ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत किरण माने हा माऊच्या वडिलांच्या भूमिकेत होता. त्याची ही भूमिका सगळ्यांना खूप आवडत होती. (Gulamb Village people stop shooting of mulagi zali ho serial)

अशातच अशी बातमी आली आहे की, किरणच्या गाववाल्यांनी या मालिकेची शूटिंग थांबवली आहे. ‘मुलगी झाली हो’ या मालिकेचे शूटिंग गुळंब गावात चालू होती. किरण मानेला मालिकेतून काढल्यामुळे गुळंब गावाच्या ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी या मालिकेची शूटिंग थांबण्याची मागणी केली आहे. त्यांनी मालिकेच्या निर्मात्यांना एक पत्र लिहून ही माहिती दिली आहे.

त्यामुळे आता मालिकेची शूटिंग नक्की कुठे होईल? मालिकेसाठी किरण मानेला निर्माते पुन्हा मालिकेत घेतील का? की मालिकेचे शूटिंग दुसरीकडे होईल? याकडे संपूर्ण प्रेक्षक वर्गाचे लक्ष लागले आहे.

सोशल मीडियावर जरी त्यांनी राजकीय भूमिका घेतल्यामुळे त्याला काढण्यात आले आहे अशी चर्चा असली तरी देखील मालिकेतील त्याच्या सह कलाकारांनी आता यावर स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची सेटवरील वर्तणूक योग्य नसल्याने त्यांना मालिकेतून काढण्यात आले, असे सांगितले आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा