Monday, June 17, 2024

सिद्धार्थच्या निधनाच्या धक्क्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतेय शहनाझ; ‘या’ शोमधून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

प्रसिद्ध अभिनेता आणि ‘बिग बॉस’च्या १३ व्या पर्वाचा विजेता सिद्धार्थ शुक्ला याचे निधन सर्वांसाठीच धक्कादायक होते. त्याने जगाचा निरोप घेऊन आता जवळपास ४ महिने लोटले आहेत. त्याच्या निधनाने सर्वात जास्त कोणी खचलं असेल, तर ती आहे अभिनेत्री शहनाझ गिल. आजही ती सिद्धार्थच्या निधनामुळे दु:खातून बाहेर आली नाहीये. त्यामुळे तिची झलक खूपच कमी पाहायला मिळतेय. सोशल मीडियावरही तिचा वावर कमी झाला आहे. तिच्या अकाऊंटवर अधिकतर पोस्ट या ब्रँड एंडॉर्समेंटच्याच आहेत. मात्र, आता शहनाझ दीर्घ काळानंतर कोणत्यातरी शोचा भाग बनत आहे.

शहनाझ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या ‘हुनरबाज: देश की शान’ या रियॅलिटी शोमध्ये दिसणार आहे. या शोचा प्रोमो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओत शहनाझ सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि कियारा आडवाणी (Kiara Advani) यांच्या ‘शेरशाह‘ या सिनेमातील ‘रांझा’ हे गाणे गाताना दिसत आहे. शहनाझला हे गाणे गाताना पाहून तिचे चाहतेही खूपच खुश झाले आहेत.

शहनाझ ही अभिनेत्रीसोबतच पंजाबची प्रसिद्ध गायिकादेखील आहे. तिने आपल्या गायकी कौशल्याने चाहत्यांमध्ये आपल्या ओळख निर्माण केली आहे. ‘बिग बॉस’च्या १३व्या पर्वात तिचे हे कौशल्य सर्वांनीच पाहिले होते. अशातच अभिनेत्री ‘हुनरबाज’ मालिकेच्या मंचावर आपल्या गायकीचा जलवा दाखवताना दिसणार आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत शहनाझ म्हणत आहे की, “माझ्यामध्येही एक प्रतिभा आहे, जी मला शांतता देते.” यानंतर ती गाणे गाताना दिसत आहे. या व्हिडिओत शहनाझने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. शहनाझचा हा अंदाज चाहत्यांना खूपच आवडत आहे.

शहनाझचा हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये असे लिहिण्यात आले आहे की, “हुनरबाजच्या शोधात शहनाझही देतेय आमची साथ.”

‘हुनरबाज: देश की शान’ हा रियॅलिटी शो २२ जानेवारीपासून दर शनिवारी आणि रविवारी रात्री ९ वाजता कलर्सवर चॅनेलवर पाहायला मिळणार आहे. दुसरीकडे शहनाझबद्दल बोलायचं झालं, तर ती सध्या आपल्या कामावर लक्ष देत आहे. तसेच सिद्धार्थच्या निधनाच्या धक्क्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा