जगप्रसिद्ध गायक जस्टिन बीबरच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अमेरिकेत झालेल्या एका कार्यक्रमानंतर पार्टी सुरू असलेल्या हॉलसमोर जोरदार गोळीबार झाला आहे. या गोळीबारात अनेकजण जखमी झाली आहेत. या घटनेने जस्टिन बिबरच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
जस्टिन बीबर (justin bieber) हा जगप्रसिद्ध गायक म्हणून ओळखला जातो. त्याचे जगभरात असंख्य चाहते आहेत. जस्टिनच्या जादुई आवाजाचे भारतात सुद्धा अनेक चाहते आहेत, जे त्याच्या आवाजाचे फॅन आहेत. याच पार्श्वभूमीवर जस्टिनच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. नुकताच लॉस एंजेलॉसमध्ये जस्टिनचा जोरदार कार्यक्रम झाला. हा कार्यक्रम आटोपून पार्टी करत असलेल्या जस्टिनच्या हॉटेलबाहेर जोरदार गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात जस्टिनचे सहकारी गायक कोडेक ब्लैक आणि त्याचे आणखी दोन साथीदार जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. या संपूर्ण घटनेची सध्या चौकशी सुरू आहे. मात्र गोळीबार करणार्या इसमाचे नाव अद्याप समोर आलेले नाही.
समोर आलेल्या बातमीनुसार, या पार्टीत ड्रेक, लियो, केंडल जेनर असे अनेक दिग्गज सेलिब्रिटी सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या बाहेर दोन गटांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर या भयानक गोळीबारात झाल्याचे, तिथे असलेल्या लोकांनी सांगितले आहे. अचानक या लोकांनी गाडीवर चढून हल्ला केला आणि गोळीबार सुरू झाला असे त्याठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितले. या घटनेने सध्या जस्टिनच्या चाहत्यांना मोठी चिंता लागली आहे. काही वर्षांपूर्वी जस्टिन मुंबई मध्येसुद्धा आला होता. त्याचा भारतातील पहिलाच कार्यक्रम जोरदार यशस्वी ठरला होता.
हेही वाचा –