जस्टिन बिबरचे चालते फिरते घर पाहिले का? दिग्गज कलाकारांच्या बंगल्यालाही टक्कर देईल त्याची आलिशान बस


लोकप्रियता, प्रसिद्धी ही एका विशिष्ट वयानंतर मिळते या वाक्याला अपवाद नक्कीच आहे. मूर्ती लहान, पण कीर्ती महान असे बरेच उदाहरण आहेत, ज्यांनी खूपच कमी वयात तुफान प्रसिद्धी, लोकप्रियता आणि पैसा कमावला आहे. असे लोकं भारतीय सिनेसृष्टीसोबतच हॉलिवूडमध्ये देखील आहेत. असाच एक हॉलिवूड स्टार सिंगर म्हणजे जस्टिन बीबर. कॅनेडियन सिंगर असणाऱ्या जस्टिनने खूपच कमी वयात जबरदस्त लोकप्रियता मिळवली.

लंडनमध्ये जन्मलेल्या जस्टिनने कमी वयात लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवली. तो अवघ्या २७ वर्षाचा आहे. मात्र, आज जर आपण त्याची लाईफस्टाईल पाहिली, तर आपल्या लक्षात येईल की, तो मोठमोठ्या कलाकारांना देखील कमाईच्या आणि आलिशान लाईफस्टाईलच्या बाबतीत टक्कर देतो. आज आपण या लेखातून जस्टिनच्या आलिशान बसबद्दल जाणून घेणार आहोत.

साधारण तीन महिन्यांपूर्वी जस्टिनने स्वतः त्याच्या या लग्झरी बसचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. ही बस बाहेरून देखील दिसायला अतिशय सुंदर आणि आकर्षक आहे. या व्हिडिओमध्ये त्याने या बसचा कानाकोपरा दाखवत प्रत्येक गोष्ट का ठेवली आहे, त्याचा काय वापर आहे सर्व दाखवले. या बसमध्ये बऱ्यापैकी मोकळी जागा असून, प्रत्येक गोष्ट अगदी विचार करून आणि योग्य ठेवली आहे. बसमध्ये एक सुंदर बेडरूम असून त्यात त्याचे शूजचे मोठे कलेक्शन ठेवले आहे. सोबतच सोना बाथसारख्या काही सुविधा देखील दिल्या आहेत.

हा व्हिडिओ GQ ने शेअर केला असून या व्हिडिओच्या सुरुवातीला जस्टिन त्याच्या फॅन्सला बस बघण्याचे आमंत्रण देताना दिसत आहे. बसमध्ये प्रवेश केल्या केल्या सर्वात आधी दिसते ते त्याचे वर्कस्टेशन जिथे तो त्याचे सर्व ई-मेल्स चेक करतो. समोर डेस्कवर त्याच्या पत्नीचा हेलीचा फोटो देखील आहे. अतिशय सुंदर लाईट्स, उत्तम इंटेरियर असलेली ही बस जणू बिबरचे चालते फिरते छोटे घरच आहे.

पुढे तो त्याचे आलिशान आणि अतिशय सुंदर बेड असलेले बेडरूम दाखवतो. जेव्हा तो प्रवास करतो, किंवा बसने कुठे जातो तेव्हा तो येथे तासंतास झोपतो. त्याने सांगितले की, ही त्याच्यासाठी अशी जागा आहे, जिथे तो सर्वात जास्त वेळ घालवतो, बेडवर पडल्या पडल्या चित्रपट बघतो.

बेडरूम शेजारीच त्याचे बाथरूम आहे, या बाथरूममध्ये त्याचे सोना बाथ आहे. हे दाखवताना त्याला कॅनडा ते लॉसएंजिलिस प्रवास देखील आठवला. या बसमध्ये वेगवेगळ्या रंगांचे एलईडी लाईट्स देखील लावले आहे. हे लाईट्स त्याला सर्वात जास्त आवडतात.

जस्टिनला या बसमध्ये सर्वात जास्त लॉन्ज एरिया आवडतो. जेथील फोल्डेबल सोफा खूपच मस्त आहे. त्याला या बसची सर्वात जास्त आवडणारी गोष्ट सांगताना तो म्हणतो, “ही बस माझ्या प्रवासात माझ्यासोबतच असते.”

‘सिंगल बेबी’ या गाण्यातून त्याने एका रात्रीतच प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळवली. टीनएजमध्ये असतानाच तो लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला. आज जस्टिन हॉलिवूडचा सर्वात महागड्या आणि लोकप्रिय गायकांपैकी एक आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सुशांत सिंग राजपूत जगातील एकमेव नासा ट्रेंड एस्ट्रोनॉट अभिनेता होता’; बहीण श्वेता सिंग कीर्तीने केला खुलासा

-अरे बापरे! ‘इंडियन आयडल १२’मध्ये पवनदीपकडून झाली मोठी चूक; परीक्षकांच्याही उंचावल्या भुवया

-ट्रान्सफॉर्मेशन असावे तर असे! रवी दुबेने ‘इतक्या’ वेळेत कमी केले १० किलो वजन; तुम्हालाही बसणार नाही विश्वास


Leave A Reply

Your email address will not be published.