मनोरंजनविश्वातील एक लोकप्रिय कपल म्हणून भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांना ओळखले जाते. ते दोघं अतिशय उत्तम आणि परफेक्ट कपल आहे. हे दोघंही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असून ते सतत त्यांचे आणि मुलाचे फोटो शेअर करत असतात. दोघेही एकत्र अनेक शोचे सूत्रसंचालन करताना दिसतात. यातच आता हर्षने एक व्यक्तव्य केले आहे, ज्यामुळे तो चांगलाच गाजत आहे. हर्ष एक लेखक असून तो भारतीसोबतच्या नात्यामुळे आणि त्यांच्या लग्नामुळे आधी लाइमलाईट्मधे आला. त्याने नुकतेच त्याच्या आणि भारतीच्या कमाईबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत.
लाफ्टर क्वीन असलेली भारती आणि एक उत्तम लेखक असलेला हर्ष दोघंही नेहमीच त्यांच्या केमिस्ट्रीने लोकांचे लक्ष वेधून घेत असतात. अनेक शोला होस्ट करणारे हे दोघं आपापल्या क्षेत्रात बेस्ट आहेत. हर्षने नेहमीच पडद्यामागे भरपूर काम केले आहे. मात्र भारतीच्या यश आणि लोकप्रियतेमागे तो नेहमीच लपला जातो.
View this post on Instagram
भारती आणि हर्षच्या कमाईच्या बाबतीत होणाऱ्या तुलनेबद्दल त्याने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, “तर काय झाले जर माझी पत्नी माझ्यापेक्षा जास्त पैसा घरी आणते? मी उलट स्वतःला भाग्यवान समजतो. की माझी पत्नी तिच्या आयुष्यात जास्त चांगले काही करत आहे. मला अशा लोकांवर हसायला येते ज्यांना माझ्या पेक्षा जास्त भारतीच्या कमाई आणि लोकप्रियतेबद्दल समस्या आहेत. असे लोकं खूप कमी आहेत, ज्यांना त्यांच्या पत्नीमुळे आणि पत्नीच्या लोकप्रियतेमुळे आनंद वाटतो. आम्ही सोबत खुश आनंदी आहोत. इतरांना जो विचार करायचा तो ते करू शकतात.”
पुढे हर्षने तो बाबा झाल्यानंतर त्याचे आणि भारतीचे आयुष्य कसे बदलले यावर भाष्य करत म्हटले, “ही भावना जगापेक्षा देखील खास आहे. आमच्यासाठी सर्व काही बदलले. खासकरून माझ्यासाठी. आता मी जास्त प्लॅनिंग करतो आणि जास्त गंभीर झालो आहे. हे तर काहीच नाही माझ्या लिखाणातही खूप बदल झाले आहेत.” या मुलाखतीमध्ये त्याने ही देखील हिंट दिली की, ते दोघं लवकरच अभिनयात पदार्पण करू शकतात. तसेही करण जोहरच्या सिनेमात हर्ष आणि भारती पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चा मागील बऱ्याच काळापासून आहेत.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पंधराच दिवसात आईवडील गमवणाऱ्या लेखिकेबद्दल आणि सेटवर काम करणाऱ्यांबद्दल मिलिंद गवळी यांची ‘ती’ पोस्ट व्हायरल
‘जैतर’ मधून समोर येणार सत्यघटनेवर आधारित रोमांचक प्रेमकहाणी, ‘या’ तारखेला प्रदर्शित हाेणार चित्रपट