Monday, October 14, 2024
Home बॉलीवूड जाणून घ्या अभिनेत्री अमृता रावची चित्रपटालाही मागे टाकणारी ‘अनमोल’ अशी प्रेमकहाणी

जाणून घ्या अभिनेत्री अमृता रावची चित्रपटालाही मागे टाकणारी ‘अनमोल’ अशी प्रेमकहाणी

बॉलिवूड अभिनेत्री अमृता राव(Amrita Rao) ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. ती मोजक्याच चित्रपटांमध्ये दिसली असली तरी तिचा निरागसपणा आणि सौंदर्यासाठी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. अमृता तिच्या अनेक भूमिकांसाठी ओळखली जाते, पण 2006 मध्ये आलेल्या ‘विवाह‘ चित्रपटानंतर तिला वेगळी ओळख मिळाली. विवाह चित्रपटात आपल्या साधेपणाने आणि निरागसतेने सर्वांची मने जिंकणारी अमृता राव दरवर्षी 7 जुनला तिचा वाढदिवस साजरा करते. अशात अभिनेत्रीच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्या प्रेमाची सुंदर आणि रंजक कहाणी.

अभिनेत्री अमृता राव आणि पतू अनमोलची प्रेमकहाणी एखाद्या चित्रपटाच्या कथेला लाजवेल अशीच आहे. अनेक वर्षे आपली प्रेमकथा लपवून ठेवणाऱ्या या अमृताने आरजे अनमोलसोबत गुपचूप लग्न केले. अमृता आणि अनमोलची प्रेमकहाणी पहिल्या भेटीपासून लग्नापर्यंत आणि नंतर त्यांच्या पहिल्या मुलाच्या जन्मापर्यंत अनेक प्रकारे रंजक आहे. सर्वात रंजक कथा त्यांच्या पहिल्या भेटीची आहे जी अगदीच अनपेक्षितपणे झाली होती. अमृता राव तिच्या एका चित्रपटाच्या संदर्भात रेडिओ स्टेशनवर पोहोचली होती, जिथे ती अनमोलला पहिल्यांदा भेटली होती. येथे अनमोलने अमृताची मुलाखत घेतली होती, त्यानंतर दोघांमधील जवळीक वाढू लागली. अमृताला अनमोलचा आवाज आवडला, तर अभिनेत्रीचा साधेपणा आणि सौंदर्य अनमोलच्या हृदयाला भिडले आणि अशा प्रकारे त्यांची मैत्री सुरू झाली. मैत्रीनंतर अनमोलने त्यांच्या नात्याला पुढे नेण्यासाठी एक अतिशय वेगळा मार्ग निवडला होता. आरजे अनमोलने त्याच रेडिओ स्टेशनची मदत घेतली जिथे तो अमृताशी पहिल्यांदा भेटले होते.

याबद्दल अभिनेत्रीने एका मुलाखतीत सांगितले की, तिच्या रेडिओ शोदरम्यान अनमोलने तिला मेसेज केला आणि शो ऐकण्यास सांगितले आणि नंतर एका गाण्याच्या माध्यमातून आपले प्रेम व्यक्त केले. अमृता आणि आरजे अनमोल यांनी जवळपास सात वर्षे त्यांचे नाते सर्वांपासून लपवून ठेवले. दीर्घकाळ एकमेकांना डेट केल्यानंतर या जोडप्याने 2016साली अत्यंत साधेपणाने लग्नगाठ बांधली. या लग्नसोहळ्याला दोघांचे कुटुंबीय आणि काही जवळचे मित्र उपस्थित होते. अमृताने काही काळापूर्वी पहिल्यांदाच तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. लग्नाच्या चार वर्षानंतर, दोघेही नोव्हेंबर 2020मध्ये एका मुलाचे पालक झाले, ज्याचे नाव दोघांनी वीर ठेवले.(happy birthday amrita rao know vivah fame girl special lovestory)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
प्रतीक्षा संपली! भाऊराव कऱ्हाडे दिग्दर्शित ‘टीडीएम’ चित्रपट ‘या’ दिवशी येणार चाहत्यांच्या भेटीला

अभिनेते नागेश भोसले बनले मुंबईचे ‘महापौर’, काय आहे नेमके प्रकरण? लगेच वाचा

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा