Wednesday, June 12, 2024

अभिनेते नागेश भोसले बनले मुंबईचे ‘महापौर’, काय आहे नेमके प्रकरण? लगेच वाचा

प्रसिध्द अभिनेते नागेश भोसले मुंबईचे महापौर बनले ही बातमी वाचून रसिकांना आश्चर्य वाटलं असेल, पण ही बातमी खरी असून नागेश भोसले हे त्यांच्या नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘चिडियाखाना’ या चित्रपटात मुंबईच्या महापौरांच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘दिल दाेस्ती एटसेट्रा’ आणि ‘इस्सक’ चित्रपटानंतर प्रख्यात दिग्दर्शक मनीष तिवारी आपला नवा चित्रपट ‘चिडियाखाना’ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) द्वारा निर्मित आणि भारती स्टूडियोज द्वारा प्रस्तुत हा चित्रपट शिलादित्य बोरा यांच्या प्लाटून वन द्वारा देशभरात प्रदर्शित केला आहे.

दिग्दर्शक मनीष तिवारी यांनी चित्रपटाच्या कथानकाबाबत बोलताना सांगितले, “चिडियाखाना ही अशा एका संघर्षरत मुलाची सूरजची कथा आहे ज्याला फुटबॉल खेळणे खूप आवडत असते. आणि फुटबॉलमध्ये तो स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करतो. या कामी त्याला मित्र, शाळा, कॉलेज खूप मदत करतात. एवढेच नव्हे तर त्याला शत्रू मानणारेही त्याचे मित्र बनतात. सूरज बिहारमधून मुंबईला आपले फुटबॉलचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आलेला असतो आणि या मोहमयी जगात तो स्वतःचे स्थान कसे निर्माण करतो ते मी या चित्रपटात दाखवले आहे. ‘चिडियाखाना’ हा खेळाची भावना आणि एकजुटतेची कथा आहे. छोटे छोटे थेंब मिळून समुद्र कसा बनतो ते या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. ”

nagesh bhosle
nagesh bhosle

नागेश भोसले म्हणाले की या चित्रपटात मी मुंबईच्या महापौर यांच्या भूमिकेत दिसणार आहे. हा रोल करताना खूप मज्जा आली. राजेश्वरी सचदेव, प्रशांत नारायणन, रवी किशन, गोविंद नामदेव आणि अंजन श्रीवास्तव यांनी त्यांच्या भूमिका आहेत. ‘चिडियाखाना’ ही एका संघर्ष करणाऱ्या मुलाची कथा आहे. चित्रपटाच्या संपूर्ण टीमने एक उत्कृष्ट चित्रपट प्रेक्षकांसमोर आणलेला आहे. ‘चिडियाखाना’ चित्रपट रसिकांनी आवर्जून पहावा असे आवाहन निर्माते दिग्दर्शक यांच्याकडून करण्यात आले आहे.(Actor Nagesh Bhosle became the Mayor of Mumbai, what is the real story? Read it now)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अभिनेत्री शर्लिन चोप्राचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; युजर म्हणाले, “निर्लज्जपणा…”
‘तारक मेहता…च्या सेटवर इतका छळ झाला की..’, ‘तारक मेहता…’च्या ‘बावरी’ने केला धक्कादायक खुलासा

हे देखील वाचा