Sunday, April 13, 2025
Home कॅलेंडर लग्नाआधी आई बनलेली एमी जॅक्सनला बॉयफ्रेंड करायचा मारहाण, ‘असे’ होते तिचे आयुष्य

लग्नाआधी आई बनलेली एमी जॅक्सनला बॉयफ्रेंड करायचा मारहाण, ‘असे’ होते तिचे आयुष्य

बॉलिवूड ते साऊथ चित्रपटसृष्टीत एमी जॅक्सनने आपले अभिनय कौशल्य सिद्ध केले आहे. भारतीय अभिनेत्रीच्या आधी ती परदेशी मॉडेल आहे. तिचे पूर्ण नाव एमी लुईस जॅक्सन आहे. हिंदी ते दक्षिण चित्रपटसृष्टीत आपले अभिनय कौशल्य दाखविणाऱ्या एमीने वयाच्या १६ व्या वर्षी मॉडेलिंगमधून आपल्या करिअरला सुरुवात केली. ती तिच्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफमुळे खूप चर्चेत असते. एमी ३१ जानेवारीला तिचा ३० वा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर मग तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित गोष्टी जाणून घेऊया.

एमीचा जन्म ३१ जानेवारी १९९२ मध्ये झाला. एमीने (Amy Jackson) बॉलिवूडशिवाय साऊथ फिल्म ‘आय’ आणि ‘थेरी’ सारख्या सिनेमांमध्ये काम केले आहे. याशिवाय ही अभिनेत्री ‘सिंग इज ब्लिंग’ आणि ‘२.०’ या हिंदी चित्रपटात काम करताना दिसली आहे.

Here's How Amy Jackson Marked Her 'Beautiful Baby Boy's Special Day'

एमी जॅक्सनने ‘एक दिवाना था’ मधून हिंदी चित्रपटांमध्ये तिच्या करिअरची सुरुवात केली होती. यामध्ये प्रतीकसोबत एमी काम करताना दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला नसला तरी याने दोन्ही कलाकारांमधील जवळीक नक्कीच वाढली.

अफेअरच्या बातम्यांदरम्यान दोघांनीही टॅटू बनवले होते एमीच्या टॅटूवर ‘माझे प्रेम माझे प्रतीक आहे’ असे लिहिले होते तर प्रतीकने लिहिले होते, ‘माझे प्रेम माझी एमी आहे.’ मात्र, त्यांचे नाते फार काळ टिकले नाही आणि त्यांचे ब्रेकअप झाले.

यानंतर अभिनेत्रीचे नाव २०१३ मध्ये चॅम्पियन बॉक्सर जो सेलकिर्कसोबत जोडले गेले. लिव्हरपूलमधील एका हॉटेलमध्ये तिच्या बॉयफ्रेंडवर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप झाल्यानंतर दोघे एकत्र खूप वादात सापडले होते. यानंतर २०१९ मध्ये एमी पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली. जेव्हा तिने बॉयफ्रेंड जॉर्ज पनायिओटूच्या मुलाला जन्म दिला. त्यावेळी ती लग्न न करता आई झाली होती. मुलगा अँड्रियासला जन्म दिल्यानंतर अभिनेत्रीने बॉयफ्रेंडशी लग्न केले.

जर आपण एमीच्या व्यावसायिक जीवनाबद्दल बोलायचे झाले, तर तिने २००९ मध्ये मिस टीन वर्ल्ड कॉम्पिटिशन, मिस टीन लिव्हरपूल आणि मिस टीन ग्रेट ब्रिटनचा किताब जिंकला आहे. यानंतर २०१० मध्ये तिने मिस इंग्लंड स्पर्धेतही भाग घेतला पण तिला अंतिम टप्पा पार करता आला नाही. एमी हिंदी चित्रपटसृष्टीत ती कमाल दाखवू शकली नाही पण ती दक्षिणेच्या चित्रपटसृष्टीत खूप सक्रिय आहे.

एमी जॅक्सन सध्या चित्रपटांसोबतच सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. ती इंस्टाग्रामवर स्वतःशी संबंधित पोस्ट शेअर करत असते. अनेकदा तिचे हॉट आणि बोल्ड फोटो चर्चेत असतात.

हेही वाचा :

 

हे देखील वाचा