Thursday, March 28, 2024

‘फिमेल डॉन’पासून ते ‘उमराव जान’पर्यंत, या सदाबहार पात्रात रेखाजींनी जिंकलीयेत प्रेक्षकांची मने

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी त्यांच्या अभिनयाने आणि सौंदर्याने सगळ्यांना वेड लावले होते. ज्यांची ओळख आजही बॉलिवूडमध्ये कायम आहे. यातीलच एक अभिनेत्री रेखा आहेत. ज्यांनी त्यांच्या सौंदर्याने अक्षरशः आख्ख्या तरुण वर्गाला भुरळ घातली होती. त्या म्हणजे अभिनेत्री . रेखा यांनी त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीत एका पेक्षा एक सुपरहिट चित्रपटात काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. चला तर जाणून घेऊया त्यांच्या करिअरमधील काही सुपरहिट चित्रपट… (actress rekha’s career story, lets know about it)

खून भरी मांग : या सिनेमामध्ये रेखाजींनी व्यक्तिरेखा साकारली आहे. ही त्यांच्या करिअरसाठी सगळ्यात उत्तम व्यक्तिरेखा ठरली. अभिनयच्या दुसरे इनिंगला सुरुवात करत असताना ही भूमिका त्यांना खूप काही देऊन गेली. या सिनेमातल्या रेखाजींच्या व्यक्तिरेखेला एवढी पसंती मिळाली की, हा सिनेमा त्यांच्या करिअरचा एक अविभाज्य भाग बनला.

आस्था : या सिनेमाने एक अभिनेत्री म्हणून रेखाजींना वेगळे स्थान दिले आहे. आत्तापर्यंतच्या सगळ्या सिनेमांमध्ये रेखाजींना वेगळ्या भूमिकांमध्ये प्रेक्षकांनी बघितलं होतं. परंतु या सिनेमांमध्ये एक मध्यमवर्गीय स्त्री आर्थिक आणि वैयक्तिक कारणामुळे कशी वेश्याव्यवसायात येते. याच्यावर आधारित ही कथा होती आणि ही भूमिका एवढ्यात ताकतीने रेखाजींनी साकारली की, ती त्यांच्या करिअरचा मोठा टर्निंग पॉइंट ठरली.

उत्सव : या सिनेमामध्ये रेखाजींनी वसंत सेनाची व्यक्तिरेखा साकारली होती. या सिनेमात शेखर सुमनने मुख्य भूमिका केली होती.

कामसूत्र :  हा सिनेमा बोल्ड विषयावरती भाष्य करणारा होता. कामसूत्र वाचणारी एक शिक्षिका अशी ही भूमिका होती ती तेवढ्याच ताकतीने रेखाजींनी साकारली. विषयावर असं लिहायचं.

फूल बने अंगारे : 1991ला आलेला हा सिनेमा. या सिनेमात आपला बदला घेण्यासाठी एक महिला पोलिसात भरती होते आणि ज्या लोकांचा बदला घ्यायचा असतो तो बदला पूर्ण करते.

मुकद्दर का सिकंदर : रेखा आणि अमिताभ बच्चन ही जोडी नेहमीच प्रेक्षकांना भावलेली आहे. ‘मुकद्दर का सिकंदर’ या सिनेमात रेखाजींनी जोहरा ही व्यक्तिरेखा साकारली होती . प्रेक्षकांच्या फार पसंद पडली.

उमराव जान : ‘उमराव जान’ हा सिनेमा रेखाजींचा माइलस्टोन सिनेमा ठरला. या सिनेमासाठी नॅशनल अवॉर्ड  मिळाले. अमरीन ही व्यक्तिरेखा सिनेमांमध्ये त्यांची होती.

खिलाडियों का खिलाडी  : रेखाजी या सिनेमात हेली डॉनच्या भूमिकेत दिसल्या. रेखाजींचा हा अंदाज प्रेक्षकांना फार भावला. अजूनही त्या व्यक्तिरेखेची स्तुती केली जाते.

हेही वाचा –
कंगना रणौतने ‘तेजस’ चित्रपटातील डायलॉगचे श्रेय दिले पंतप्रधान मोदींना, जाणून घ्या काय आहे कारण
अवघ्या 15 वर्षांच्या वयात रेखांनी दिला होता किसिंग सीन, घरखर्चासाठी ‘बी’ ग्रेड चित्रपटातही केले काम

हे देखील वाचा