Tuesday, March 5, 2024

‘अष्टपैलू नट’ हे विशेषण सार्थ ठरवणारा ‘जावेद जाफरी’, राजकारणात भाजपच्या बड्या नेत्याला दिलेले आव्हान

हॅप्पी बर्थ डे जावेद जाफरी!

हो आज म्हणजेच  सोमवारी (दि. 4 डिसेंबर) या कलाकाराचा वाढदिवस. बॉलिवूड मध्ये असे फार कमी कलाकार आहेत, ज्यांना कोणतीही भूमिका दिली की, तिला ती स्वतःची बनवून टाकतात.

असं वाटतं की, हे पात्र जणू याच कलाकारांसाठी बनलेलं आहे जणू… अशाच कालाकारांपैकी एक नाव आहे ते आपल्या सर्वांच्या लाडक्या जावेद जाफरी चं! चला तर मग आज जावेदच्या वाढदिवसानिमित्ताने त्याच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात!

जावेद जाफरीचा जन्म हा 4 डिसेंबर, 1963 साली झाला. आज जावेदचा 60 वा वाढदिवस! जावेद जाफरी (Jaaved Jaffrey) हा एकेकाळचे महान विनोदी दिवंगत अभिनेते जगदीप जाफरी यांचा मुलगा. जावेदच्या अभिनय कौशल्याबद्दल काय म्हणावं? विनोदी भूमिका म्हणू नका, खलनायक म्हणू नका किंवा नायक म्हणू नका, प्रत्येक भूमिका त्याने आपलीशी केली आहे. त्याच्या या उत्कृष्ट अभिनयाचं रहस्य त्याचे बाबाच आहेत. विनोदातलं त्याचं टायमिंग हे त्याच्या बाबांचीच देण आहे असं जावेदने स्वतः अनेकदा मुलाखतींमधून आपल्याला सांगितलेलं आहे. जावेद एक उत्तम अभिनेता, तर आहेच परंतु तो एक उत्तम नर्तक देखील आहे. जावेदचा ‘बुगी वुगी’ हा डान्स रिऍलिटी शो मागच्या दशकात खूपच गाजला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jaaved Jaaferi (@jaavedjaaferi)

जावेदची कला ही त्याच्या वडिलांची देण आहे. हे जरी तो मान्य करत असला तरी आयुष्याचा काही काळ तो त्याच्या वडिलांवर रागावला होता. याला कारणही तसंच होतं म्हणा. व्यसन कुणाला सोडत नाही. तसंच जावेदचे वडील जगदीप जाफरी हे देखील व्यसनाच्या प्रचंड आहारी गेले होते. त्यांना दारू आणि जुगाराचं व्यसन जडलं होतं आणि यामुळेच जावेद त्यांच्याशी बराच काळ अबोला धरून बसला होता. कालांतराने जगदीप यांनी व्यसन सोडलं परंतु पुन्हा त्यांना व्यसनाने कचाट्यात ओढलं यामुळे जावेद आणि जगदीप यांचे संबध काही खास नव्हते. परंतु शेवटी जगदीप हे जावेदचे वडीलच तर होते त्यामुळे त्याने अबोला जास्त न ताणता त्यांना स्वीकारलं आणि पुन्हा एकदा सारं काही ठीक झालं.

बॉलिवूड आणि राजकारण या दोघांमधील अंतर हे दिवसेंदिवस कमीच होत चाललं आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी राजकारणात त्यांचं नशीब आजमावलं आहे. काही त्यात यशस्वी झाले, तर काही अपयशी ठरले. याला जाफरी देखील अपवाद ठरला नाही. जावेद हा कलाकारासोबतच एक समाजाची जाणीव असलेला नट आहे. वारंवार सरकारच्या चुकीच्या धोरणांवर तो ताशेरे ओढत असतो. त्याच्या याच सवयीमुळे त्याने उत्तरप्रदेशच्या लखनऊ मधून 2014 ची लोकसभा निवडणूक केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षकडून लढवली. लढवली तर लढवली तीही कोणाविरुद्ध… तर भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्या विरोधात! अपेक्षेप्रमाणे जावेद हा ती निवडणूक हरला परंतु राजकारणात त्याने नशीब आजमावून पाहिलं हे मात्र खरं.

जावेदच्या करियरबद्दल काय बोलणार… त्याचे सिनेमे आणि त्याने साकारलेल्या भूमिका या आपल्या सगळ्यांच्या लक्षात आहेतच. परंतु त्याच्या काही महत्त्वाच्या सिनेमांबद्दल इथे उल्लेख करावाच लागेल. धमाल सिनेमाची सीरिज, ३ इडियट्स, अशी ही बनवा बनवीचा हिंदीतील रिमेक पेइंग गेस्ट, कुली नंबर 1, ‘सूर्यवंशी’ यातील जावेदच्या भूमिका वाखाणण्याजोग्या आहेत. अशा या अष्टपैलू नटाला दैनिक बोंबाबोंबकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
कॉमेडियनच नाही, तर डान्सर म्हणूनही कमवलंय बरंच नाव, जावेद जाफरींबद्दल खास गोष्टी एकाच क्लिकवर
‘या’ व्यक्तीमध्ये अडकला आहे सोनम कपुरचा जीव! दुबई दौऱ्यापूर्वी म्हणाली…

हे देखील वाचा