Thursday, March 28, 2024

‘या’ व्यक्तीमध्ये अडकला आहे सोनम कपुरचा जीव! दुबई दौऱ्यापूर्वी म्हणाली…

बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर हिने तिचा लेक वायूला जन्म दिल्यानंतर अवघ्या तीन महिन्यातच ग्लॅमरच्या दुनियेत परतली आहे आणि ती रेड कार्पेटवर आपला जलवा दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. मात्र, अत्रिनेत्री थाेडी नर्व्हस देखील आहे, पण या कारणास्तव अभिनेत्री बॉलिवूडपासून दूर नाही. खरं तर, सोनम कपूर नुकतीच सौदी अरेबियाला गेली होती. यादरम्यानचा तिचा एअरपोर्ट लूक चाहत्यांना प्रचंड आवडला, पण व्हिडिओमध्ये सोनम खूश दिसली नाही. काय आहे यामागचे कराण चला जाणून घेऊया…

नुकताच सोनम (sonam kapoor) हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती एका कारमध्ये बसलेली दिसत आहे आणि आपला मुलगा वायूला मिस करत आहे. व्हिडिओमध्ये सोनम म्हणाली, “मी वायुला खूप मिस करत आहे आणि त्याला पहिल्यांदाच असं सोडून आल्यानंतर मला खूप अस्वस्थ वाटत आहे. भले ते फक्त एका दिवसासाठीच का असेना. वायु माझ्या आई आणि बहिणीसोबत आहे, त्यामुळे मला फारशी चिंता नाही. मी फक्त 20 तासांसाठी जात आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonam Kapoor Ahuja (@sonamkapoor)

सोनमचा एअरपोर्ट लूक चाहत्यांना खूप आवडला होता. तिने लांब क्रीम ट्रेंच कोटसह बेज रंगाचा पोशाख परिधान केला होता. कार्यक्रमासाठी जेद्दाहला जात असताना तिने मोठ्या आकाराचे सनग्लासेस देखील घातले होते. व्हिडिओ शेअर करताना अभिनेत्रीने तिच्या टीमचे कौतुक केले आणि पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले, “माझ्या सर्वोत्तम टीमसोबत.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonam Kapoor Ahuja (@sonamkapoor)

रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सोनमने ऑफ स्लीव्हज असलेल्या लाल गाऊनमध्ये स्टायलिश एन्ट्री केली होती. तिने यासोबत डायमंड नेकलेसही घातला होता, ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती. सोनम व्यतिरिक्त करीना कपूर, सैफ अली खान, शाहरुख खान आणि प्रियांका चोप्रा यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही या महोत्सवात हजेरी लावली.(bollywood actress sonam kapoor talks about her nervousness see viral video)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
दु:खद! लोकप्रिय कॉमेडियन कोचू प्रेमन यांचे निधन, वयाच्या 68व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

शाॅकिंग! प्रसिद्ध टिक-टाॅक स्टारचं अवघ्या 21व्या वर्षी निधन, कलाविश्वात शोककळा

हे देखील वाचा