‘बूम’ सिनेमातील ‘त्या’ सीनसाठी कॅटरिना अन् गुलशन ग्रोव्हर यांनी दोन तास रूममध्ये केला होता सराव आणि…


आज बॉलिवूडमध्ये कॅटरिना कैफ हे एक मोठे नाव आणि ब्रँड आहे. परदेशातून भारतात येत कॅटरिनाने तिच्या अभिनयाने, सौंदर्याने आणि नृत्याने सर्वच भारतीयांना भुरळ घातली. अनेक सुपरहिट सिनेमे देणाऱ्या आणि प्रेक्षकांसह समीक्षकांचीही वाहवा मिळवणाऱ्या कॅटरिनाने स्वबळावर तिचे एवढे प्रस्थ या ग्लॅमर जगात निर्माण केले. या क्षेत्रात येऊन इथे यशस्वी होण्यासाठी तिला मोठा संघर्ष तर करावा लागलाच, शिवाय अनेक अपयश देखील पचवावे लागले. शुक्रवारी (१६ जुलै) कॅटरिना तिचा ३८ वा वाढदिवस साजरा करत आहे. हॉंगकाँगमध्ये जन्मलेल्या कॅटरिनाने भारतात येत स्वतःचे विश्व तयार केले.

सन २००३ मध्ये ‘बूम’ सिनेमातून कॅटरिनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिने तिच्या पहिल्याच सिनेमात प्रचंड बोल्ड सीन्स दिले होते. या सिनेमात तिच्यासोबत महानायक अमिताभ बच्चन आणि ‘बॅड मॅन’ गुलशन ग्रोव्हर, जॅकी श्रॉफ, झीनत अमान देखील होते.

तिच्या या सिनेमाबद्दल आणि या चित्रपटातील बोल्ड सीन्सबद्दल एक किस्सा खूपच प्रसिद्ध आहे. या सिनेमात कॅटरिनाने गुलशन ग्रोव्हर यांच्यासोबत बरेच बोल्ड सीन्स दिले आहेत. तिचा या सिनेमात एक किसिंग सिंग गुलशन ग्रोव्हरसोबत होता आणि या सीनमध्ये अमिताभ बच्चन देखील होते. त्यामुळे त्यावेळी सेटवरचे वातावरण अतिशय अवघडले होते. कॅटरिना देखील तिचा पहिलाच असा सीन असल्यामुळे खूप अस्वस्थ होती. मात्र, सीन तर करायचा होता मग काय करणार? तेव्हा गुलशन ग्रोव्हर आणि कॅटरिना कैफ एका रूममध्ये गेले तिथे त्यांनी दोन तास त्या सीनचा सराव केला आणि बाहेर आले. त्यांनतर त्यांनी हा सीन एका टेकमध्येच ओके केला.

‘बूम’ हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर या सीनने खूप चर्चा मिळवली आणि वादही निर्माण केला. त्यावेळी हा सीन करणे खूपच मोठे आणि हिंमतीचे काम होते. मात्र, असे असूनही त्यांनी हा सीन केला आणि चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या सीनच्या खूप चर्चा तर झाल्या मात्र, हा सीन चित्रपटाला अपयशापासून वाचवू शकला नाही. आजही हा सीन यूट्यूबवर अनेक लोकं बघतात. या सीनला यूट्यूबवर करोडो व्ह्यूज आहेत. याच चित्रपटादरम्यान आयेशा श्रॉफ यांनी कॅटरिनाचे नाव कॅटरिना टरकोटावरून कॅटरिना कैफ केले.

कॅटरिनाने तिच्या करिअरमध्ये तिन्ही खानसोबतच अक्षय कुमार, सिद्धार्थ मल्होत्रा, ऋतिक रोशन, रणबीर कपूर, आदित्य रॉय कपूर आदी अनेक आघाडीच्या कलाकारांसोबत काम केले आहे.

तिची जोडी सर्वात जास्त सलमान आणि अक्षयसोबत खूपच पसंत केली गेली. आगामी काळात कॅटरिना अक्षयसोबत ‘सूर्यवंशी’ सिनेमात दिसणार असून, लवकरच ती सलमानसोबत ‘टायगर ३’ मध्ये देखील दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आदिल खानसोबत जोरदार ठुमके लावताना दिसली शिल्पा शेट्टी; ‘चुरा के दिल मेरा’ गाण्यावरचा धमाल परफोर्मेंस होतोय व्हायरल

-खरी-खुऱ्या आयुष्यातली ‘बार्बीडॉल’ आहे कॅटरिना कैफ; वाचा तिच्याबद्दल कधीही न ऐकलेल्या गोष्टी

-निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ‘डिज्नी प्रिंसेस’ दिसतेय रुबीना दिलैक; पाहा अभिनेत्रीच्या मनमोहक अदा


Leave A Reply

Your email address will not be published.