Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

अर्जुन कपूरने रोमांटिक फोटो शेअर करत मलायकाला वाढदिवसाच्या दिल्या हटके शुभच्छा..

बॉलिवूडची बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी मलायका अरोरा ओळखली जाते. ती आपल्या अभिनयासोबतच वैयक्तीक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असते. मलायका आपल्या फॅशन सेंन्सने आणि फिटनेसने नेहमी लोकांचे लक्ष वेधत असते. आज मलायका आपला 49 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यामुळे तिच्या एक्स बॉयफ्रेंड अर्जुन कपूर याने मलायकाला सोशल मीडिवर हटके शुभेच्छा दिल्या आहेत.

अनेक दिवसापासून मलायका अरोरा आणि अर्जून कपूर (Arjun Kapoor) हे जोडपे एकमेकांना डेट करत आहेत. आज मलायकाचा वाढदिवस असल्याने अर्जुनने त्या दोघांचे रोमांटिक अंदाजतले फोटो शेअर करुन हटके शुभेच्छा दिल्या आहेत. इंडस्ट्रीमधील लोकप्रिय जोडी म्हणून यांच्याकडे पाहिले जाते. या दोघांनी अनेक पार्टी आणि इवेंटला एकत्रच हजेरी लावली होती. दोघांची केनिस्ट्री अनेकांना भुरळ घालत असते. आज आपल्या प्रियसीचा वाढदिवस म्हणल्यावर अर्जुन तर खास शुभच्छा देणारच. त्यानो आपल्या अदिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये दोघे अरशामध्ये बघून सेल्फी काढत आहेत.

अर्जुनने हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “द माय यिन यंग हैपी बर्थडे बेबी, जे तु आहेस तेच रहा, खुश रहा, माझीच बनून रहा.” दोघांची केमिस्ट्री पाहूण लोकांच्या मनावर भुरळ घालत आहे. चाहत्या पोस्ट केलेल्या फोटोवर कमेंटचा वर्षाव करत आहे. त्यासोबतच अनेक सेलिब्रिटींनी मलायकाला शुभेच्छा देत कमेंट केल्या आहेत. अभिनेत्री तारा सुतारिया हिने हार्टवाले एमोजी ड्रॉप केले मात्र, दिग्दर्शक अभिषेक कपूर याने लिहिले की, “जन्मदिवसाच्या शुभच्छा मल्ला.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

अनेक दिवसापासून डेट करणारे कपल एकमेकांवर प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी सोडत नाही. मीडियासमोर नेहमी स्पॉट होणारे कपल कधी लग्न बंधनात अडकेल का? याचा सगळ्यांनाच प्रश्न पडला आहे. मलायका आपल्या फॅशनमुळे दिवा, मिस इंडियासारखे कार्यक्रम करत असते. तिच्या फॅशन सेंन्समुळे ती नेहमीच चर्चेत असते. आजही ती तेवढीच सुंदर आणि बोल्ड दिसते तिचे वय तिच्य चेहऱ्यावर कधीच दिसून येत नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
अभिषेकनं नेटकऱ्याची केली बोलती बंद! ‘बेरोजगार’ बोलण्याऱ्या ट्रोलरला दिलं सडेतोड उत्तर
झायरा वसीमने बॉलिवूड इंडस्ट्रीला ठोकला राराम! कारण ऐकूण तुम्ही व्हाल थक्क…

हे देखील वाचा