Wednesday, July 3, 2024

‘कबीर सिंग’ फेम निकिता दत्ता बनली होती ‘फेमिना मिस इंडिया’ फायनलिस्ट, केलंय इमरान हाश्मीच्या चित्रपटात काम

अनेक अभिनेत्रींनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात ही टेलिव्हिजनमधून केली. मात्र, पुढे जाऊन त्यांनी टेलिव्हिजनला अलविदा करत बॉलिवूडमध्ये त्यांचे नशीब आजमवण्याठी पदार्पण केले. याचप्रमाणे टेलिव्हिजनवरून बॉलिवूडच्या दुनियेत पाऊल ठेवणाऱ्या अभिनेत्री निकिता दत्तानेही तिची ओळख निर्माण करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. तिला शाहिद कपूर अभिनित ‘कबीर सिंग’ या चित्रपटातून चांगलीच प्रसिद्धी मिळाली. तिचा ‘डिबुक’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक होत असून, या चित्रपटाला सध्या संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. निकिताची फिल्मी कारकीर्द अजून फार मोठी नाही. मात्र, तिने खूप कमी कालावधीत वेगळी ओळख निर्माण केली आहे. निकिता दत्ता सोमवारी (१३ नोव्हेंबर) तिचा वाढदिवस साजरा करत आहे. ती आज ३१ वर्षांची झाली आहे. चला तर मग तिच्या वाढदिवसानिमित्त निकिताच्या लहानपणापासून ते आतापर्यंतच्या प्रवासाविषयी जाणून घेऊया.

निकिताचा जन्म १३ नोव्हेंबर, १९९१ रोजी झाला. तिचे वडील भारतीय नौदल अधिकारी आहेत. तिचे बालपण विशाखापट्टणम, मुंबई आणि कोची येथे गेले. तिचे शालेय शिक्षण आणि पदवीपर्यंतचे शिक्षण मुंबईतून झाले.

निकिताने २०१२ मध्ये फेमिना मिस इंडियामध्ये भाग घेतला आणि ती फायनलिस्ट ठरली. त्यानंतर २०१४ मध्ये ‘लेकर हम दिवाना दिल’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाची निर्मिती सैफ अली खानने केली होती.

निकिताने २०१५ मध्ये ‘ड्रीम गर्ल- एक लडकी दिवानी’ या टीव्ही शोमधून टीव्हीवर पदार्पण केले. यात तिच्यासोबत श्रद्धा आर्या आणि मोहसिन खान देखील होते. तिने या शोमध्ये जास्त काळ काम केले नाही आणि यावर्षी हा शो सोडला.

निकिताने २०१६ मध्ये ‘एक दुजे के वास्ते’ या शोमध्ये काम केले होते. यात तिच्या व्यक्तिरेखेचे ​​खूप कौतुक झाले आणि त्यासाठी तिला पुरस्कारही मिळाला. २०१७ पर्यंत तिने टीव्हीवर काम केले.

निकिताने २०१८ मध्ये ‘गोल्ड’ आणि ‘लस्ट स्टोरीज’ या चित्रपटातून पुनरागमन केले. सन २०१९मध्ये ती शाहिद कपूर आणि कियारा आडवाणी अभिनित ‘कबीर सिंग’ मध्ये दिसली.

निकिता २०२० मध्ये ‘मस्का’मध्ये दिसली होती. या चित्रपटात तिच्यासोबत मनीषा कोईराला आणि जावेद जाफरीही होते. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता.

निकिता दत्ता यावर्षी अभिषेक बच्चन अभिनित ‘द बिग बुल’मध्ये दिसली. यामध्ये तिने तिच्या साधेपणाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांना वेड लावले. अलीकडेच तिने इमरान हाश्मीसोबत ‘डिबुक’ चित्रपटात दिसली आहे, जो ऍमेझॉन प्राईमवर पाहता येईल.

 

हेही नक्की वाचा-
‘पुढचा प्रवास खडतर असेल, तर…’, म्हणत अमेय वाघने वाढदिवशी स्वतःलाच दिलेली ‘ही’ खास भेट
-Children’s Day 2022: ‘तारे जमीन पर’ ते ‘मासूम’पर्यंत, बालदिनानिमित्त ‘हे’ बॉलिवूड चित्रपट नक्की पाहा

हे देखील वाचा