Saturday, June 29, 2024

नुसरत भरुचाने अल्पावधीतच बनवली वेगळी ओळख, ‘या’ चित्रपटांनी लुटली प्रेक्षकांची वाहवा

नुसरत भरुचा (nusarat bharucha) आज बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपटांव्यतिरिक्त ती तिच्या बोल्ड स्टाइलसाठी ओळखली जाते. एका दशकापेक्षा कमी कालावधीच्या कारकिर्दीत, नुसरत भरुचाने चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनय केला आहे. अशात नुसरत बुधवारी (दि. 17 मे)ला तिचा 38वा वाढदिवस साजरा करणार आहे. या खास प्रसंगी जाणून घेऊया अभिनेत्रीच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांबद्दल…

राजकुमार राव (rajkumar rao) आणि नुसरत भरुचा यांचा ‘छलांग’ हा हलक्याफुलक्या कॉमेडीसह संदेश देण्याचा प्रयत्न करतो. प्रेम, कॉमेडी, मैत्री आणि शत्रुत्व अशा भावनांनी भरलेला हा चित्रपट एक संपूर्ण पॅकेट आणि इमोशनल ड्रामा आहे. या चित्रपटात राजकुमार राव एका पीटी टीचरच्या भूमिकेत आहे तर नुसरत भरुचाने कॉम्प्युटर टीचरची भूमिका केली आहे. हा चित्रपट Amazon Prime Video वर उपलब्ध आहे.

सोनू के टिटू की स्वीटी
कार्तिक आर्यन,(kartik aaryan)  सनी सिंग आणि नुसरत भरुचा यांचा हा चित्रपट दोन मित्रांच्या कथेवर आधारित आहे. भावापेक्षा दोन मित्रांमध्ये जास्त प्रेम असल्याचे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. त्यांच्या आयुष्यात एक ट्विस्ट येतो जेव्हा त्यांच्यापैकी एकाला स्वीटी (नुसरत भरुचा)शी लग्न करायचे असते. या चित्रपटाने 100 कोटी क्लबमध्ये प्रवेश केला. लव रंजन खुरानाचा हा चित्रपट यूट्यूबवर उपलब्ध आहे.

ड्रीम गर्ल
नुसरत भरुचा आणि आयुष्मान खुराना (ayushman khurana) यांचा हा चित्रपट एका तरुणाची कथा आहे, ज्याला नोकरी मिळत नाही, मग तो एका मुलीच्या आवाजात लोकांचे मनोरंजन करण्यासाठी कॉल सेंटरमध्ये काम करतो. राज शांडालिया दिग्दर्शित या चित्रपटाची कथा खूपच रंजक आहे. ड्रीम गर्ल हा नुसरतचा दुसरा १०० कोटींचा चित्रपट होता. हा चित्रपट Zee5 वर उपलब्ध आहे.

प्यार का पंचनामा
कार्तिक आर्यन, नुसरत भरुचा, दिव्येंदू शर्मा आणि रेयो एस. बखिरता अभिनीत हा चित्रपट तीन मित्रांच्या रोमँटिक आयुष्यातील कथा सांगते. त्याचबरोबर या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात कार्तिक आर्यन आणि नुसरत भरुचा यांच्याशिवाय सनी सिंग आणि ओंकार कपूर मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट Voot वर उपलब्ध आहे.(happy birthday nusrat bharucha know about her best films)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
“दिल तुम्हारा हो गया” या ‘अनलॉक जिंदगी’मधील गाण्यातून व्यक्त होणार मनातील ‘त्या’ हळुवार भावना

अमृता खानविलकरने शेअर केला ‘मस्तानी’ लूक, फाेटाे व्हायरल

हे देखील वाचा