Thursday, June 13, 2024

आदिल खानला धक्का; प्रसिद्ध अभिनेत्री राखी सावंतला दिलासा; खासगी न्यायालयाने घेतला ‘हा’ निर्णय

प्रसिद्ध अभिनेत्री राखी सांवतला आज कोणत्याही ओळखेची गरज नाही. ती सोशल मीडिावर सतत सक्रिय असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. राखी सावंत ही इंडस्ट्रीतील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे. जी तिच्या असामान्य आणि अनोख्या शैलीसाठी ओळखली जाते. ती कोणत्या ना कोणत्या कारणावरून सतत चर्चेत असते. कोणी तिला ड्रामा क्वीन म्हणतात तर कोणी नौटंकी. पण, आदिल दुर्रानीसोबतच्या तिच्या लग्नाचे किस्से कोणापासून लपलेले नाहीत.

अभिनेत्री राखी सावंतला (rakhi sawant) आज सत्र न्यायालयाने अंतरिम संरक्षण दिले आहे. पती आदिल दुर्राणी यांच्या तक्रारीवरून आंबोली पोलिसांनी एफआयआर दाखल करून अभिनेत्रीला हे संरक्षण दिले आहे. आदिलने आरोप केला आहे की, राखीने कथितपणे त्याचे खाजगी व्हिडिओ मीडियाला शेअर केले आहेत. पण राखी सावंतचे वकील अ‍ॅडव्होकेट अली काशिफ खान देशमुख यांनी सांगितले की, राखीला आज बुधवारी अंतरिम संरक्षण देण्यात आले आहे.

राखी सावंतचे वैवाहिक जीवन रुळावरून घसरले आहे. राखी आणि तिचा पती आदिल यांच्यात बराच काळ न्यायालयात वाद सुरू आहे. राखी सावंतने आदिलवर मारहाण आणि घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते, त्यानंतर आदिलला तुरुंगात जावे लागले होते. मात्र, सध्या ते बाहेर आले आहेत. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आदिलने राखीवर अनेक आरोपही केले.

ऑगस्टमध्ये तुरुंगातून सुटका होताच आदिलने राखी सावंतवर अनेक गंभीर आरोप केले होते. आदिल यांने पत्रकार परिषदही आयोजित केली होती. आदिलने अभिनेत्रीवर आरोप करत म्हटले की, राखीने त्याचे खूप शोषण केले. इतकेच नाही तर आदिलने राखीवर त्याचा न्यूड व्हिडिओ बनवल्याचा आरोपही केला आहे. आदिल म्हणतो की, त्याला ड्रग्ज देण्यात आले होते. याशिवाय राखी सावंत तिच्या आईच्या कॅन्सरच्या नावाखाली लोकांना लुटायची, असेही तो म्हणाला.

राखीने मीडियासमोर त्याचे वैयक्तिक व्हिडिओ दाखवले, असा आरोप आदिल दुर्रानीने राखीवर केला आहे. या प्रकरणी आंबोली पोलिसांनी राखी सावंतविरुद्ध तक्रार दाखल केली. राखीविरुद्धच्या या एफआयआरमध्ये सत्र न्यायालयाने त्याला अंतरिम संरक्षण दिले आहे.राखी आणि आदिलने जुलै 2022 मध्ये लग्न केले होते. (Bollywood famous actress rakhi sawant granted interim protection after adil durrani case filed against her)

आधिक वाचा-
‘… म्हणून ओटीटी प्लॅटफॉर्मवर भेदभाव आहे’, ‘कांतारा 2’ फेम अभिनेत्याचे धक्कादायक विधान
झकास जमलंय!, प्रिया बापटच्या नव्या फोटोशूटने वेधलं चाहत्यांचं लक्ष

हे देखील वाचा