Friday, March 29, 2024

हॅप्पी बर्थडे! ‘आशिकी’ चित्रपटाच्या यशानंतर एकाच रात्रीत स्टार बनलेला ‘राहुल रॉय’, मिळाल्या होत्या १८ सिनेमांच्या ऑफर

बॉलिवूडमध्ये असे अनेक जबरदस्त अभिनेते होऊन गेले आणि आहेत, ज्यांनी नव्वदच्या दशकात आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात एक श्रेष्ठ स्थान निर्माण केले. सोबतच आपल्या सिनेमातील गाण्यांमुळेही ते नेहमीच चाहत्यांच्या मनात राहिले आहेत. यातील ‘अब तेरे बिन’, ‘मैं दुनिया भूला दूंगा’, ‘नजर के सामने’ ही गाणी ऐकल्यानंतर ज्याचं नाव सर्वप्रथम मुखात येतं तो म्हणजे एका रात्रीत स्टार झालेला अभिनेता ‘राहुल रॉय‘. आज राहुल आपला 54 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा जन्म 9 फेब्रुवारी 1968 साली कोलकातामध्ये झाला होता. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त आपण त्याच्या कारकीर्दीबद्दल जाणून घेणार आहोत.

‘आशिकी’ चित्रपटातून केली अभिनय कारकीर्दीची सुरुवात
बॉलिवूडमधील इतर अभिनेत्यांप्रमाणे राहुलनेही आपल्या कारकीर्दीची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती. परंतु ऐंशी दशकाच्या शेवटी त्याची आई एका फॅशन मॅगझिनमध्ये लेखक म्हणून काम करत होती. त्यादरम्यान तिच्या कामाने आनंदित होऊन महेश भट्ट यांनी त्यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी भट्ट यांनी त्यांच्यामार्फत राहुलचे फोटो पाहिले. त्याचवेळी भट्ट म्हणाले की, राहुल हा केवळ सिनेमासाठी बनला आहे. त्यांनी राहुलला सन 1990 मध्ये आपल्या ‘आशिकी’ चित्रपटात मुख्य भूमिकेतील अभिनेता म्हणून साईन केले. अशाप्रकारे राहुलने आपल्या कारकीर्दीची सुरुवात ‘आशिकी’ चित्रपटातून केली. या सिनेमातील ‘मैं दुनिया भूला दुंगा’, ‘जाने जिगर जानेमन’, ‘बस एक सनम चाहिए’, ‘नजर के सामने’ अशा अफलातून गाण्यांनी सर्वांची मने जिंकली.

‘आशिकी’मधील हेअरस्टाईल ट्रेंड बनली
‘आशिकी’ चित्रपटाच्या यशानंतर राहुल एका रात्रीत सुपरस्टार बनला होता. हा चित्रपट आणि त्यातील गाण्यांतील  अभिनेत्री अनु अगरवालसोबतच्या त्याच्या केमिस्ट्रीने सर्व सिनेरसिकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. यादरम्यान तो आणखी एका कारणामुळे प्रसिद्ध झाला, ते म्हणजे त्याच्या ‘हेअरस्टाईल’मुळे. त्याची हेअरस्टाईल ही ट्रेंड बनली होती. तसेच या हेअरस्टाईलचा त्याचा एक वेगळाच चाहतावर्ग होता.

‘आशिकी’ चित्रपटाच्या यशानंतर राहुलला मिळाल्या होत्या 18 चित्रपटांची ऑफर
‘आशिकी’ चित्रपटाच्या अफाट यशानंतर राहुलला तब्बल 18 चित्रपटांची ऑफर मिळाली होती. परंतु असे म्हणतात की, त्याला स्वत: ला जास्त काम करावेसे वाटले नाही म्हणून त्याने त्यातील बहुतेक चित्रपट नाकारले. त्याने मूठभर सिनेमांमध्ये अभिनय केला. पण तो त्याच्या पहिल्या सिनेमांच्या तुलनेत फारसा यशस्वी झाला नाही. 1999 नंतर त्याने जवळजवळ सात वर्षांसाठी चित्रपटातून विश्रांती घेतली होती.

एकदा त्याच्याविरोधात नोंदविण्यात आली होती एफआयआर
राहुल एकदा अपघातामुळे कायदेशीर अडचणीत आला होता. ज्यावेळी ‘जब जब दिल में’ या चित्रपटाच्या ऍक्शन सीक्वेन्ससाठी शूट करत होता, त्यावेळी ब्रेक फेल झाल्यामुळे त्याचे जीपवरील नियंत्रण सुटले आणि त्याने शूटिंग पाहणाऱ्या एका माणसाला धडक दिली होती. तो व्यक्ती गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर राहुलविरूद्ध गोरेगाव पोलिस ठाण्यात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती.

मनीषा कोईराला केले होते डेट
सर्व बॉलिवूड स्टार्सच्या बाबतीत, रॉयच्या वैयक्तिक जीवनाबद्दल बर्‍याचदा क्वचितच चर्चा केली जात होती. काही वर्षांपूर्वी त्याने अभिनेत्री मनीषा कोईराला डेट केल्याची माध्यमांत चर्चा होती. याव्यतिरिक्त त्याचे अभिनेत्री सुमन रंगनाथनबरोबर अफेयरही होते.

त्यानंतर तो मॉडेल राजलक्ष्मी खानविलकर हिच्यासोबत रिलेशनशीपमध्ये होता आणि दोघांनी 2000 मध्ये लग्न केले. मात्र, लग्नाच्या 14 वर्षानंतर या जोडप्याचे घटस्फोट झाले होते.

राहुलचे आहे प्रॉडक्शन हाऊस
राहुलचे ‘राहुल रॉय प्रॉडक्शन’ नावाचे प्रॉडक्शन हाऊस देखील आहे. नोव्हेंबर 2011 मध्ये ‘इलान’ हा चित्रपट त्याच्या बॅनरखाली बनलेला पहिला चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात राहुल, भोजपुरी अभिनेता-राजकारणी मनोज तिवारी आणि गजेंद्र चौहान हे होते.

राहुलने केले या चित्रपटांमध्ये काम
राहुलने आतापर्यंत ‘साजन’, ‘जनम’, ‘जनम’, ‘तमाशा’, ‘कभी ना हारे’, ‘नसीब’, ‘मेघा’, ‘हँसते खेलते’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. याव्यतिरिक्त राहुलने हिंदीसोबतच भोजपुरी चित्रपटांमध्येही काम केले आहे.(happy birthday rahul roy lets know as his film career)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दिग्दर्शक भाऊरावच्या नजरेने कैद केले दोन नवे चेहरे, ‘टीडीएम’मध्ये दिसणार त्यांच्या अभिनयाची कमाल

सिद्धार्थ, कियारा यांना शुभेच्छा देताना बॉलिवूडवर पुन्हा एकदा कंगनाने साधला निशाणा

हे देखील वाचा