Tuesday, June 25, 2024

चित्रपटसृष्टीला बहारदार संगीत देणारे ‘मोहम्मद खय्याम’, त्यांच्या जबरदस्त संगीताने केली प्रेक्षकांवर जादू

बॉलिवूडमध्ये अनेक दिग्गज संगीतकार मंडळी होऊन गेली आणि आहेत. त्यातीलच एक नाव म्हणजे ‘मोहम्मद जहूर खय्याम’. खय्याम अत्यंत नावाजलेले संगीतकार आहेत. त्यांनी अनेक सुपरहिट गाणी बॉलिवूडला दिली आहेत. आणि त्यातूनच ते खूप नावारूपाला आले. त्यांनी सुमधुर गाण्यांतून प्रत्येक संगीत प्रेमीच्या मनावर राज्य केले आहे. त्यांच्या या गाण्यांमुळेच आजही प्रेक्षकांच्या ओठांवर त्यांचं नाव आहे. शनिवार (१८ फेब्रुवारी) त्यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने त्यांच्या संगीतातील कामगिरीवर टाकलेली एक नजर…

त्यांचा जन्म १८ फेब्रुवारी १९२७ मध्ये ‘जालंधर’ च्या जवळ राहोन येथे झाला होता. लहानपणापासूनच खय्याम यांना चित्रपट पाहण्याचा छंद होता, आणि त्यांचा हाच छंद त्यांना दिल्लीपर्यंत घेऊन गेला. तिथून पुढे ते आपली कारकीर्द घडवण्यासाठी मुंबईला रवाना झाले. खय्यामजी यांनी ‘कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है’, ‘मै पल दो पल का शायर हूं’ यासारख्या गाण्यांना संगीत दिले. आयुष्यातल्या अनेक घटनांना अनुसरून ते गाण्यांना संगीत देतात ही त्यांच्या गाण्यांची खासियत आहे. याच कारणांमुळे त्यांनी सगळ्या श्रोत्यांच्या मनात जागा निर्माण केली आहे.

Photo Courtesy: Screengrab/Youtube/People & History

संगीत प्रेमींच्या मनात बनवले स्थान
अवघे 17 वर्षाचे असताना त्यांनी त्यांच्या संगीत कारकीर्दीची सुरुवात केली. 1963 साली त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘फूटपाथ’ या पहिल्या चित्रपटात त्यांनी काम केले. त्यानंतर त्यांच्या कारकीर्दीची गाडी सुसाट निघाली. खय्याम यांनी ‘आखरी खत’, कभी कभी, त्रिशूल, नुरी बाजार, उमराव जान यांसारख्या चित्रपटात बहारदार संगीत देऊन अवघ्या संगीत‌ प्रेमींच्या मनात अढळ स्थान निर्माण केले.

खय्याम यांनी त्यांच्या काळातले दिग्गज संगीतकार ‘हुसनलाल भगतराम’ यांच्याकडून संगीताचे प्रशिक्षण घेतले होते. ते जवळपास 5 वर्षापर्यंत या दिग्गज कलाकारांच्या सहवासात राहिले होते. या दरम्यान त्यांनी संगीतातील अनेक छोट्या गोष्टी शिकून घेतल्या. या व्यतिरिक्त त्यांनी ‘बाबा चिश्ती’ यांच्याकडे देखील संगीताचे प्रशिक्षण घेतले.

जानेवारी 1947 मध्ये खय्याम जेव्हा पहिल्यांदा मुंबईला आले होते, तेव्हा ‘रोमिओ ज्युलियट’ या चित्रपटाची शूटिंग चालू होती. या चित्रपटात त्यांना गायनाची संधी मिळाली.

‘शगुन’ या चित्रपटात जगजीत कौर यांनी एक गजल गायली होती. ‘तुम अपना रंज-ओ-ग़म अपनी परेशानी मुझे दे दो ‘ ही गजल ते शेवटच्या श्वासापर्यंत गुणगुणत होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आईच्या सांगण्यावरून साईन केला ‘हा’ चित्रपट; करिश्माने केला मोठा खुलासा
स्मृती इराणीची लेक शेनेलच्या रिसेप्शनमध्ये शाहरुखचीच हवा, एकदा पाहाच फाेटाे

हे देखील वाचा