Tuesday, April 23, 2024

BIRTHDAY SPECIAL |शाहरुख- काजोललाही आपल्या इशाऱ्यावर नाचवणाऱ्या वरुण धवनचा असा आहे सिनेसृष्टीतील प्रवास, एकदा नजर टाका

क्षेत्र कोणतेही असो तिथे कष्टाला पर्याय नसतो. मग ते कलाकार असो किंवा सामान्य व्यक्ती. ते आपले ध्येय साध्य करण्यासाठी अतोनात कष्ट करतात. आता कलाकार म्हटलं की, सर्वांना त्यांचे यश दिसते. परंतु त्यांनी इथपर्यंत पोहोचण्यासाठी घेतलेली मेहनत मात्र अनेकांना दिसत नाही. सर्वांचा आवडता ‘चॉकलेट बॉय’ वरुण धवनबाबतही असेच काहीसे आहे. २४ एप्रिल वरुण आपला वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त आपण त्याच्या अभिनय प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया…

 

View this post on Instagram

 

A post shared by VarunDhawan (@varundvn)

वरुणचा जन्म २४ एप्रिल, १९८७ रोजी मुंबईत झाला होता. वरुणचे वडील डेविड धवन आणि त्याचा भाऊ रोहित धवन दोघेही चित्रपट दिग्दर्शक आहेत. घरातूनच वरुणला चित्रपटाचे वातावरण मिळाले होते. त्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली. तो एक उत्तम अभिनेता आहे. याव्यतिरिक्त तो आपल्या डान्ससाठीही ओळखला जातो.

वरुणला बनायचे होते रेसलर
एका मुलाखतीदरम्यान वरुणने सांगितले होते की, त्याला रेसलर बनायचे होते. मात्र, अचानक त्याचा चित्रपटांमधील रस वाढू लागला अन् त्याने चित्रपटाच्या दिशेनेच आपली वाटचाल सुरू केली.

आपल्या इशाऱ्यावर शाहरुख आणि काजोललाही नाचवले
वरुणने नॉटिंगहॅम येथील ट्रेंट विद्यापीठातून बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले आहे. शिक्षण संपल्यानंतर त्याने चित्रपटांत आपले नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला. त्याने करण जोहरसोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून शाहरुख खान आणि काजोल अभिनित ‘माय नेम इझ खान’ चित्रपटात काम केले. त्याने त्यांनाही आपल्या इशाऱ्यावर नाचवले असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by VarunDhawan (@varundvn)

या चित्रपटातून ठेवले होते बॉलिवूडमध्ये पाऊल
वरुणने सन २०१२ मध्ये मुख्य भूमिकेत करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इअर’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात त्याच्यासोबत आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्राही मुख्य भूमिकेत दिसले होते.

जेव्हा प्रवाश्याने समजले होते हॉटेल कर्मचारी
वरुणने ‘ऑक्टोबर’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानची एक घटनेला उजाळा देत खुलासा केला होता की, चित्रपटाची शूटिंग एका पंचतारांकित हॉटेलमध्ये झाली होती. तिथे शूटिंगदरम्यान परदेशी प्रवाश्याने त्याला खरोखरच हॉटेल कर्मचारी समजले होते आणि त्याला रूम सर्व्हिसची ऑर्डर देऊन निघून गेला होता. त्यानंतर त्यानेही हे स्टार असल्याचे विसरून त्या प्रवाश्याचे सर्व काम केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by VarunDhawan (@varundvn)

एका चित्रपटासाठी घेतो कोट्यवधी मानधन
कलाकार नेहमीच चित्रपटासाठी भलीमोठी रक्कम घेतात. वरुणचाही यामध्ये समावेश आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, वरुण आपल्या चित्रपटासाठी तब्बल १० कोटींपेक्षाही अधिक रुपये मानधन घेतो.

नताशाने वरुणला चार वेळा केले होते रिजेक्ट
वरुणने आपली गर्लफ्रेंड नताशासोबतच्या नात्याचाही खुलासा केला होता. त्याने करीना कपूर खानच्या ‘व्हॉट वुमन वाँट’ या शोमध्ये त्याबाबत सांगितले होते. तो म्हणाला होता की, त्याने सर्वात पहिल्यांदा नताशाला सहावीला असताना पाहिले होते. त्यानंतर त्यांची मैत्री बारावीपर्यंत अगदी घट्ट झाली होती. यादरम्यान त्याने चार वेळा नताशापुढे आपले प्रेम व्यक्त केले, परंतु नताशाने कधीही त्याला होकार दिला नाही. पुढे नताशाने त्याला होकार दिला आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. वरुण आणि नताशाने या वर्षाच्या सुरुवातीला २४ जानेवारी, २०२१ रोजी लग्नगाठ बांधली.

 

View this post on Instagram

 

A post shared by VarunDhawan (@varundvn)

वरुणने या चित्रपटात केलंय काम
वरुणने आतापर्यंत ‘मैं तेरा हीरो’, ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’, ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’, ‘दिलवाले’, ‘बदलापूर’, ‘एबीसीडी २’, ‘ढिशूम’, ‘जुड़वा २’, ‘ऑक्टोबर’, ‘स्ट्रीट डान्सर ३ डी’, ‘कलंक’ आणि ‘कुली नं १’ यांसारख्या चित्रपटात झळकला आहे. त्याच्या या चित्रपटांना भरपूर प्रशंसा मिळाली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
करण जोहरच्या विश्वासामुळे राणी मुखर्जी बनली सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री, आवाजाने दिली नवी ओळख

संजीव कुमार आयुष्यभर अविवाहित असण्याचे कारण होते विचित्र, महिलांबद्दल करायचे ‘असा’ विचार

हे देखील वाचा