मराठी चित्रपटसृष्टीतली प्रसिद्ध अभिनेत्री श्रुती मराठे या दिवसांत तिच्या पोस्ट्समुळे खूप चर्चेत असते. एका पेक्षा एक फोटो शेअर करून, ती चाहत्यांना वेड लावण्यात कोणतीही कसर बाकी सोडत नाहीये. ती नेहमी सोशल मीडियावर सक्रिय राहून, तिचे वेगवेगळे फोटोशूट या ठिकाणी शेअर करताना दिसते. तिचा दिलखेचक अंदाज नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो. अशामध्ये आता श्रुतीच्या व्हिडिओने चाहत्यांवर जादू केली आहे.
श्रुती मराठेने नेहमीप्रमाणेच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती दिवे लावताना दिसत आहे. यात अभिनेत्रीचा पारंपारिक अंदाज पाहायला मिळाला आहे, ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे. यात तिच्या अदा पाहून कोणीही सहज तिच्या प्रेमात पडेल, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. तुम्ही पाहू शकता की, यात श्रुतीने जांभळ्या रंगाची काठा पदराची साडी व त्यावर गुलाबी ब्लाउज घातला आहे. केसात गजरा माळून तिने अतिशय छान मेकअप केला आहे.
दिवाळीच्या निमित्ताने शेअर केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावरील तिच्या चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तिचा हा अंदाज चाहत्यांना चांगलाच आवडल्याचे दिसून येत आहे. व्हिडिओ शेअर करता क्षणीच यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडायला सुरुवात झाली. चाहते कंमेट करून तिच्या सुंदरतेचं कौतुक करत आहेत.
श्रुतीने केवळ मराठीच नव्हे तर इतर अनेक भाषांमध्ये काम केले आहे. तिने मराठीसोबत तमिळ, कन्नड आणि हिंदी चित्रपटात काम करून, प्रेक्षकांच्या मनात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. आपल्या अभिनयासोबतच, ती सोशल मीडिया पोस्टनेही प्रेक्षकांना प्रभावित करते. दरदिवशी तिचे फोटो मोठ्या प्रमाणात इंटरनेटवर व्हायरल होत असतात.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘बाहुबली’ फेम अनुष्का शेट्टीने केला होता कास्टिंग काऊचवर मोठा खुलासा, पण काय म्हणाली होती?