Thursday, May 2, 2024

‘बाहुबली’ फेम अनुष्का शेट्टीने केला होता कास्टिंग काऊचवर मोठा खुलासा, पण काय म्हणाली होती?

‘बाहुबली’ फेम अभिनेत्री अनुष्का शेट्टीने आज बॉलिवूडमध्ये देखील तिचे नाव कमावले आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये अनुष्का एक नावाजलेली अभिनेत्री आहे. तिचे भारतातच नव्हे, तर जगभरात प्रचंड चाहते आहेत. अभिनेत्रीने आपल्या १५ वर्षांच्या कारकिर्दीत पीरियड ड्रामा, सस्पेन्स-थ्रिलर, रोमँटिक-कॉमेडी आणि हॉरर सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. परंतु प्रभास अभिनित ‘बाहुबली’ चित्रपटाने ती प्रसिद्धी झोतात आली. आज ती तिच्या अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीवर राज्य करते, पण तुम्हाला माहित आहे का? की तिने कास्टिंग काऊचबद्दल खुलासा केला आहे. चला तर मग जाणून घेऊया काय म्हणाली होती अभिनेत्री…

कास्टिंग काऊचला तोंड का दिले नाही?
अभिनेत्रीने असेही सांगितले की, तिने कास्टिंग काऊचला का तोंड दिले नाही? अनुष्का म्हणाली होती की, तिला याचा सामना करावा लागला नाही. कारण ती स्वतःला स्ट्रेटफॉर्वड मानते, काहीही झाले, तरी ती सर्वांसमोर बोलते. ती सर्वांसोबत खूप मोकळेपणाने वागते. कलाकारांना स्वतःच ठरवायचे आहे की, सोपा मार्ग आणि कमी प्रसिद्धी किंवा जास्त मेहनत करायची आहे आणि जास्त काळ इंडस्ट्रीत टिकून राहायचे आहे.

अनुष्का शेट्टीची चित्रपट कारकीर्द
अनुष्का शेट्टीच्या कारकिर्दीबद्दल बोलायच झाले, तर अनुष्काने पुरी जगन्नाथच्या २००५ च्या तेलुगू चित्रपट ‘सुपर’मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. जिथे तिने अक्किनेनी नागार्जुन आणि आयशा टाकियासोबत काम केले. यानंतर तिने अभिनेता रवी तेजा आणि प्रभास सारख्या कलाकारांसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले. अभिनेत्रीने इंडस्ट्रीला एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत.

अनुष्का शेट्टीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायच झाले, तर ती अनेक मनोरंजक प्रोजेक्टचा एक भाग आहे. ती लवकरच चित्रपट निर्माते गौतम वासुदेव मेननच्या शीर्षक नसलेल्या तमिळ- तेलुगू चित्रपटाशी जोडली जाईल अशी माहिती समोर आली आहे. यासह, माध्यमांतील वृत्तानुसार, ती ‘चंद्रमुखी २’ चित्रपटामध्येही दिसणार आहे. याचे दिग्दर्शन पी वासू करणार आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सिद्धार्थ शुक्लानंतर ‘या’ टेलिव्हिजन अभिनेत्याचा मृत्यू, नुकताच इजिप्तमध्ये गेला होता ट्रीपला

-हिना खानचं ‘मैं भी बर्बाद’ गाणं रिलीझ; अभिनेत्रीने अंगद बेदीसोबत दिले बोल्ड सीन

-‘बोल्ड सीनमुळे दिला होता खालच्या पातळीची महिला म्हणून टॅग’, मल्लिका शेरावतचा खुलासा

हे देखील वाचा