Saturday, June 29, 2024

दो दिल एक जान! बॉलिवूडमधील ‘या’ कलाकारांची मैत्री आहे सर्वात खास

ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार हा जगभरात फ्रेंडशिपदिन म्हणून साजरा केला जातो. सुखः दुखात आपल्या सदैव सोबत असणाऱ्या अमर्याद आठवणी देणाऱ्या मित्रांना त्यादिवशी खास शुभेच्छा दिल्या जातात. हिंदी सिने जगतातही असे अनेक कलाकार आहेत ज्यांच्या मैत्रीचे अनेक किस्से ऐकायला मिळतात. पडद्यावर एकमेकांसाठी जीव देणारे हे कलाकार खऱ्या आयुष्यातही त्यांच्या घट्ट मैत्रीसाठी ओळखले जातात. पाहूया हिंदी सिने जगतातील काही गाजलेले कलाकार ज्यांच्या मैत्रीची नेहमीच सिने जगतात चर्चा होते. 

जाह्नवी कपूर-सारा अली खान – बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि जान्हवी कपूर दोघीही सिने जगतातील नवोदित अभिनेत्री आहेत. अल्पावधीतच त्यांनी सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या अभिनयाची जितकी चर्चा होते. तितकीच त्यांच्या घट्ट मैत्रीचीही चर्चा होत असते. दोघींचे एकत्र फिरतानाचे, वर्कआऊट करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. अलिकडेच सारा आणि जान्हवीने करण जोहरच्या कॉफी विथ कार्यक्रमात हजेरी लावली होती. कार्यक्रमात दोघींनी त्यांच्या घट्ट मैत्रीचे अनेक किस्से प्रेक्षकांना सांगितले.

सुहाना- अनन्या- शनाया – सोशल मीडियावर जितकी हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांची चर्चा होताना दिसते तितकीच चर्चा त्यांच्या मुलांचीही होताना दिसत असते. सध्या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी सुहाना कपूर, चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे, आणि शनाया कपूर यांची नेहमीच चर्चा होताना दिसत आहे. बॉलिवूड जगतातील प्रसिद्ध स्टारकिड्स म्हणून त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. या तिघींची मैत्रीही खूप घट्ट आहे. त्यांच्या मैत्रीचे अनेक किस्से ऐकायला मिळतात. लवकरच तिघीही करण जोहरच्या बेधडक चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहेत.

करीना कपूर खान -अमृता अरोडा – करीना कपूर आणि अमृता अरोडा यांच्या मैत्रीचीही  सिने जगतात नेहमीच चर्चा होताना दिसत असते. करीना आणि अमृता यांची मैत्री दोन दशकांपासून कायम आहे. अलिकडेच जेव्हा करीनाला तिच्या वाढत्या वजनामुळे ट्रोल करण्यात आले होते. तेव्हा अमृता तिच्या समर्थनार्थ मैदानात उतरली होती.

काजोल – करण जोहर : अभिनेत्री काजोल आणि चित्रपट निर्माता करण जोहरची मैत्री अनेक वर्षांपासून कायम आहे. दोघांचीही सिनेसृष्टीतील पार्श्वभूमी असल्याने दोघेही एकमेकांना लहानपणापासून ओळखतात. ए दिल है मुश्किल चित्रपटाच्या वेळी त्यांच्यात दुरावा निर्माण झाल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये समोर आल्या होत्या. परंतु त्यानंतर दोघांनीही असे काही नसल्याचे सांगत त्यांची मैत्री जपली होती.

हेही वाचा –
फिरोज खान आणि विनोद खन्ना यांनी मैत्रीत सुखासोबतच मृत्यूचे कारण आणि तारीख घेतली होती वाटून
दिग्दर्शकाच्या ‘त्या’ एका निर्णयाने मोडली होती राजेश खन्ना आणि अमोल पालेकरांची जुनी मैत्री, वाचा सविस्तर

हे देखील वाचा