Tuesday, June 25, 2024

आजी शर्मिला टागोरसोबत ‘खास दिवशी’ मस्ती करताना दिसली सारा अली खान, पाहा व्हायरल व्हिडिओ

बाॅलिवूड अभिनेत्री सारा अली खानने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती तिची आजी आणि सदाबहार अभिनेत्री शर्मिला टागोरसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करताना दिसत आहे. दोघांचा हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर माेठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून असे दिसते की, हा कोणत्यातरी सेटवरील व्हिडिओ आहे आणि दोघेही कोणत्यातरी शो किंवा चित्रपटासाठी एकत्र शूटिंग करत आहेत.

व्हिडिओमध्ये सारा अली खान (sara ali khan) आजी शर्मिला टागोरसोबत मस्ती करताना दिसत आहे, तर व्हिडिओच्या बॅकग्राऊंडमध्ये ‘चंदा है तू, मेरा तारा है तू’ हे गाणे वाजत आहे. त्याचवेळी शर्मिला टागोर आणि सारा अली खान पहिले चंद्राकडे बोट दाखवत आहेत, ज्यानंतर दोघेही मावळत्या सूर्याकडे बोट दाखवत आहेत. यावेळी शर्मिला टागोर यांनी फुलांचा शर्ट घातला आहे, तर साराने शाॅट्स घातला आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

व्हिडिओ शेअर करताना सारा अली खानने लिहिले की, “खास दिवस.” यासोबतच तिने अनेक इमोजीही शेअर केले आहेत. शर्मिला टागोर यांची मुलगी आणि सारा अली खानची मावशी सबा पतौडी यांनी व्हिडिओवर हार्ट एक इमोजी शेअर केला आहे. या साेबतच चाहतेही अभिनेत्रीवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

नुकताच सारा अली खानचा ‘जरा हटके जरा बचके’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात तिच्याशिवाय विकी कौशलचीही महत्त्वाची भूमिका आहे. हा चित्रपट बाॅक्स ऑफिसवर दमदार कमाई करत असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. (bollywood actress sara ali khan fun time with grandmother sharmila tagore on the special day watch viral video)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
तापसीने पिवळ्या बिकिनीमध्ये समुद्रात मारली डुबकी; अभिनेत्रीचा थक्क करणारा व्हिडिओ एकदा पाहाच
190 कोटींच्या आलीशान घराबद्दल उर्वशीच्या आईने साेडले मौन; म्हणाल्या, ‘इंशाअल्लाह…’

हे देखील वाचा