Thursday, November 30, 2023

दिग्दर्शकाच्या ‘त्या’ एका निर्णयाने मोडली होती राजेश खन्ना आणि अमोल पालेकरांची जुनी मैत्री, वाचा सविस्तर

सिनेमा जेव्हा बनत असतो, तेव्हा त्यात असे काही सीन असतात, जे कलाकारांना करायचे नसतात. मात्र, दिग्दर्शकाला कुठल्या ना कुठल्या क्लृप्त्या कराव्या लागतात. असेच काहीसे 1980मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आंचल’ या सिनेमामध्ये घडले होते. या सिनेमात सुपरस्टार राजेश खन्ना, रेखा, अमोल पालेकर, प्रेम चोप्रा आणि राखी यांच्या मुख्य भूमिका होत्या. या सिनेमाचे दिग्दर्शन अनिल गांगुली यांनी केले होते. या सिनेमात अमोल आणि राखी यांनी राजेश खन्नांच्या दादा-वहिनींच्या भूमिका साकारल्या होत्या. खरं तर, वयाने राजेश खन्ना या दोघांपेक्षा मोठे होते. या सिनेमातील एका सीनमुळे राजेश खन्ना आणि अमोल पालेकर यांची जुनी मैत्री कायमची तुटली होती. काय होता तो सीन चला जाणून घेऊया…

‘आंचल’ (Aanchal) या सिनेमाची कहाणी अशी होती की, मोठ्या भावाच्या मनात आपल्या पत्नी आणि भावाविषयी संशय निर्माण होतो. मात्र, त्यांचे नाते खूपच चांगले असते.

अमोल पालेकर यांनी म्हटले, ‘नाही’
अमोल पालेकर (Amol Palekar) यांना या सिनेमातील एक सीन करायचा नव्हता. दिग्दर्शकांनी त्यांना समजवाण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मात्र, त्यांनी काहीच ऐकले नाही. शेवटी दिग्दर्शकांनी हा सीन करवून घेण्यासाठी राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांच्याकडून एक क्लृप्ती वापरावी लागली. हा सीन असा होता की, अमोल पालेकर यांना त्यांच्या चुकीसाठी राजेश खन्ना यांच्या पाया पडून माफी मागायची होती. यावेळी ते असे करत असतात, तेव्हा राजेश खन्ना यांना त्यांना लाथ मारायची असते. अमोल यांनी या सीनला नकार दिला होता, तेव्हा दिग्दर्शक अनिल गांगुली यांनी त्यांना समजावले की, हा सीन कहाणीच्या हिशोबाने खूपच महत्त्वाचा आहे. मात्र, ते काही केल्या होकार देत नव्हते.

शेवटी ‘ही’ बनवली योजना
शेवटी राजेश खन्ना आणि सिनेमाच्या दिग्दर्शकांनी मिळून एक योजना बनवली. दिग्दर्शकांनी अमोल पालेकरांना शब्द दिला की, ते फक्त गुडघ्यावर बसतील आणि माफी मागतील. यासाठी ते तयार झाले. जेव्हा सीन सुरू झाला आणि अमोल पालेकर गुडघ्यावर बसले, तेव्हा दिग्दर्शकांनी राजेश खन्नांना इशारा केला की, अमोल पालेकरांना लाथ मारून खाली पाड. त्यांनीही तसेच केले. आपल्यासोबत जे काही घडले, ते पाहून अमोल पालेकरही थक्क झाले की, यासाठी नकार देऊनही दिग्दर्शकाने हा सीन शूट केला.

असे असले, तरीही अमोल पालेकरांची स्थिती पाहून दिग्दर्शक आणि राजेश खन्ना यांनी जोरजोरात हसू लागले. मात्र, अमोल पालेकर यांनी यासाठी दिग्दर्शक आणि राजेश खन्ना यांना कधीच माफ केले नाही. या सिनेमानंतर दोघांनी कधीच एकत्र काम केले नाही. राजेश खन्ना त्यांचे सीनियर होते आणि अमोल पालेकर त्यांना चांगला मित्र मानायचे. मात्र, या सीननंतर त्यांची मैत्री कायमची तुटली. (superstar rajesh khanna films amol palekar film friendship)

अधिक वाचा- 
फिरोज खान आणि विनोद खन्ना यांनी मैत्रीत सुखासोबतच मृत्यूचे कारण आणि तारीख घेतली होती वाटून
मैत्री असावी तर अशी! अमजद खान आणि अमिताभ बच्चन यांच्या मैत्रीचा ‘हा’ किस्सा तुम्हाला करेल भावुक

हे देखील वाचा