Thursday, May 1, 2025
Home मराठी ‘हर हर महादेव’च्या वादावर सुबाेध भावेचा माेठा निर्णय; म्हणाला, ‘बापजन्मात काेणत्याही…’

‘हर हर महादेव’च्या वादावर सुबाेध भावेचा माेठा निर्णय; म्हणाला, ‘बापजन्मात काेणत्याही…’

मराठी सिनेसृष्टीतील लाेकप्रिय अभिनेता सुबोध भावे याने आपल्या दमदार अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. गेल्या काही दिवसांपासून अभिनेता त्याच्या ‘हर हर महादेव’ या मराठी सिनेमामुळे चर्चेत आहे. सुबाेधने ‘हर हर महादेव‘मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. यावरुन बराच वादही झाल्याचे पाहायला मिळाले. सुरु झालेला वाद अद्यापही संपलेला नाहीये. यापुर्वी माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी पत्रकार परिषद घेऊन या चित्रपटाला विरोध केला होता. अशात हा चित्रपट आज रविवारी 18 डिसेंबर रोजी झी मराठी या वाहिनीवर प्रसारित झाला आहे. 

संभाजीराजे यांनी ट्वीट करत म्हंटले की,”‘हर हर महादेव’ टीव्हीवर प्रदर्शित केल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांना झी स्टुडिओ जबाबदार असेल.” या संपूर्ण पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील काही शिवभक्त सुबोध भावेच्या (Subodh Bhave) भेटीसाठी पोहोचले होते. कोल्हापुरातील शिवभक्तांनी सुबोध भावेची भेट घेत सिनेमातून आक्षेपार्ह सीन काढण्याची मागणी केली आणि यावेळी सुबाेध भावेनं आपली अनअपेक्षीत भूमिका मांडली. अभिनेत्यानं यापुढं कधीही कुठल्याही बायेपिकमध्ये ऐतिहासिक भूमिका साकारणार नसल्याचे जाहिर केले.

सुबाेध भावे यांने ‘हर हर महादेव’ या चित्रपटात छत्रपती शिवरायांची भूमिका साकारली आहे. मात्र, हा चित्रपट प्रदर्शित होताच वादात सापडला. या संपूर्ण प्रकरणानंतर सुबोध म्हणाला, “मरेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर प्रेम करणार. परंतु, इथून पुढे कोणत्याही ऐतिहासिक सिनेमात कोणाचीही भूमिका बापजन्मात करणार नाही. सध्या मी एक बायोपिक करतोय. त्याचं शूटींग सुरू आहे. शूटींग सुरू असलेला हा माझा शेवटचा बायोपिक सिनेमा असेल.” असे मत सुबाेध याने मांडले.

या चित्रपटात आक्षेपार्ह सीन असल्याचा आरोप करत विराेधकानी हा सिनेमा सिनेमागृहामध्ये बंद पाडला होता. परंतु, त्यानंतर आता हा चित्रपट 18 डिसेंबर रोजी झी मराठी या वाहिनीवरून प्रदर्शित केला जाणार म्हटल्यावर विरोधी तीव्र झाले होते. इतिहासाला चुकीच्या पद्धतीने सादरीकरण करण्यात आलेला व तमाम शिवभक्तांच्या भावना दुखावणारा हा चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित करू नये, अशी मागणी स्वराज्य संघटनेने झी स्टुडीओला पत्र लिहून केली हाेती. या सुचनेकडे दुर्लक्ष केल्यास होणान्या गंभीर परिणामांना झी स्टुडिओ जबाबदार असेल, इसा इशाराही संभाजीराजे यांनी दिला होता. (har har mahadev controversy marathi actor subhodh bhave decided to not work in biopic)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
भाजप खासदार अन् अभिनेत्याच्या घरी चिमुकल्याचे आगमन, स्वागताचा झक्कास व्हिडिओ पाहाच

‘पिंजरा खूबसूरती का’ फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात, ‘या’ अभिनेत्रीसोबत घेतले सात फेर

हे देखील वाचा