Saturday, April 20, 2024

भाजप खासदार अन् अभिनेत्याच्या घरी चिमुकल्याचे आगमन, स्वागताचा झक्कास व्हिडिओ पाहाच

मंगळवारी (दि. 13 डिसेंबर) भोजपुरी अभिनेते आणि भाजप खासदार मनोज तिवारी हे वडील बनले. त्यांच्या पत्नीने मुलीला जन्मा दिला. विशेष म्हणजे, मनोज हे वयाच्या 51व्या वर्षी तिसऱ्यांदा वडील बनले आहेत. हा आनंद त्यांनी सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअरही केला होता. आता त्यांनी मुलीची पहिली झलकही दाखवली आहे. ते आपल्या मुलीला रुग्णालयातून घरी घेऊन गेले आहेत. मनोज यांच्या व्हिडिओवर चाहते जोरदार प्रतिक्रिया देत  अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.

मनोज तिवारी व्हिडिओ
मनोज तिवारी (Manoj Tiwari) यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर एक गोंडस व्हिडिओ शेअर केला आहे. यातून त्यांनी आपल्या मुलीबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. मनोज तिवारी यांनी व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “मुलगी घरी आली आहे…आनंदी आनंद… जय माँ विंध्यवासिनी.” नेटकरी त्यांच्या या व्हिडिओवर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. काहींनी मुलीच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थनाही केली.

एकाने लिहिले की, “भैय्या खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन.”

दुसऱ्या एकाने लिहिले की, “बाळाचे खूप खूप अभिनंदन.”

आणखी एकाने कमेंट केली की, “मुलीच्या आगमनाने तुमचे भाग्य सौभाग्यात बदलेल, माँ विंध्यवासिनीचा आशीर्वाद तुमच्यावर व तुमच्या परिवारावर सदैव राहो, तुमचे कुटुंब निरोगी राहो.”

या व्हिडिओत मनोज त्यांच्या चिमुकलीला हातात घेऊन घरप्रवेश करताना दिसत आहेत. यादरम्यान त्यांच्यासोबतच संपूर्ण कुटुंब उत्साहाने भरलेले दिसले. सर्वजण नवीन पाहुण्याच्या स्वागतासाठी फुलांची माळ घेऊन उभे असल्याचे दिसले. मनोज तिवारी हे घराकडे पावले टाकत असतात, तेव्हा नातेवाईकांनी त्यांच्यावर फुलांची बरसात करत त्यांचे स्वागत केले आहे.

मनोज तिवारी त्यांच्या चिमुकलीला घेऊन गाडीतून उतरताच आपल्या मोठ्या मुलीला म्हणाले की, “छोटा बाबू घरी आला आहे.” मनोज हे तिसऱ्या मुलीला घरात घेऊन गेले आणि थेट मंदिरात जाऊन थांबले. मुलीसाठी आधीपासूनच घर आणि खोलीला पूर्णपणे सजवले होते. घराच्या दरवाजावरच त्यांच्या मुलीला ओवाळून तिचे स्वागत करण्यात आले.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘माझी मुलं मुस्लिम हाेणार की हिंदू…’, जिम ट्रेनरशी लग्न केल्यानंतर अभिनेत्री ट्राेल, देवाेलिनानं दिलं चाेख उत्तर
शाहरुखच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी! ‘किंग खान’ला झाले इन्फेक्शन, फक्त भात खाऊन काढतोय दिवस

हे देखील वाचा