Sunday, April 14, 2024

‘पिंजरा खूबसूरती का’ फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात, ‘या’ अभिनेत्रीसोबत घेतले सात फेरे

मोनंरजन क्षेत्राl सध्या लग्नाचा सिजन सुरु झाला आहे. अनेक कालारांनी आपल्या जोडीदारासोबत लग्नगाठ बांधली आहे. यामध्ये नुकतंच ‘पिंजरा खूबसूरती का‘ फेम साहिल उप्पल यानेही त्याची गर्लफ्रेंड ‘इमली‘ मालिकेची लेखिका आकृती अत्रेजा हिच्यासोबत गुपचुप विवाह सोहळा उरकला आहे. यांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

टीव्ही अभिनेता साहिल उप्पल (Sahil Uppal) आणि आकृती अत्रेजा (Akruti Atreja) लग्नबंधनात अडकले आहेत. नुकतंच या जोडप्याने साखरपुड्यातच विवाह सोहळा उरकला आहे. साहिलने टीव्ही क्षेत्रामध्ये अनेक मालिकांमध्ये काम केले असून आपल्या दमदार अभिनयाने टीव्ही क्षेत्रामध्ये वेगळीच ओळख निर्माण केली आहे. त्याने शेवटी ‘पिंजरा खूबसूरती का’ (Pinjara Khubsurati Ka) या मालिकेमध्ये काम केले होते. यानंतर त्याने थेट लग्न केले आहे.

 

View this post on Instagram

 

स्टार प्लसवरील प्रसिद्ध ‘इमली’ (Imlie) मालिकेची लेखिका आकृती आणि साहिल नुकतंच लग्नबंधनात अडकले आहेत. त्याच्या लग्नामधील होणारे कार्यक्रम हळदी आणि मेहंदीचे व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत. हळदीमध्ये दोघांनीही पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केले असून दोघेही खूपच सुंदर दिसत होते. त्याशिवाय रिसेप्शनमध्ये या जोडप्याने क्लासी लूक घेतला होता. आकृतिने गोल्डन रंगाचा घागरा परिधान केला असून साहिलने गोल्डन एम्ब्रॉयडरी वाला काळ्या रंगाचा सुट घाताला होता.

 

View this post on Instagram

 

सोशल मीडियावर या जोडप्याचा लग्नाचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये दोघे एकमेकांना हार घालतान दिसून येत आहेत. आकृतीने लग्नामध्ये लाल रंगाचा घागरा परिधान केला असून त्यावर गोल्डन रंगाची ज्वेलरी घातली आहे आणि साहिलने हिरव्या रंगाची शेरवाणी परिधान केली आहे. लग्नानंतर साहिल आणि आकृतीने ग्रॅड रिसेप्शनही ठेवले होते. या ग्रॅंड पार्टीमध्ये दोघांनीही पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
भाजप खासदार अन् अभिनेत्याच्या घरी चिमुकल्याचे आगमन, स्वागताचा झक्कास व्हिडिओ पाहाच
रेणुका शहाणेंनी समोर आणली बॉलिवूडची दुसरी बाजू; म्हणाली, ‘मी वाईट अभिनेत्री…’

हे देखील वाचा