Monday, April 21, 2025
Home बॉलीवूड ‘मला जन्मच का दिला?’, जेव्हा बिग बींनी वडिलांनाच केलेला सवाल; वाचा काय होते त्यांचे उत्तर?

‘मला जन्मच का दिला?’, जेव्हा बिग बींनी वडिलांनाच केलेला सवाल; वाचा काय होते त्यांचे उत्तर?

हिंदी भाषेतील साहित्याचा आधारस्तंभ म्हटल्या जाणार्‍या हरिवंशराय बच्चन यांची आज जयंती आहे. 27 नोव्हेंबर 1907 रोजी प्रयागराज (तत्कालीन अलाहाबाद) येथे जन्मलेल्या हरिवंशराय बच्चन यांनी अनेक कादंबऱ्या लिहिल्या. पण त्याचा उल्लेख केल्यावर ‘मधुशाला’ नक्कीच प्रत्येकाच्या मनात येते, जी आजच्या तरुण पिढीनेही ऐकली आणि वाचली असेल. हिंदी चित्रपटसृष्टीतील सम्राट अमिताभ बच्चन यांचे हरिवंशराय बच्चन यांचे नाते कसे होते? हे त्यांच्या चाहत्यांना चांगलेच माहीत आहे. वडिलांची आठवण करून अमिताभ अनेकदा भावूक होताना दिसत आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की एकदा अमिताभ बच्चन यांनी वडिलांना विचारले होते की तुम्ही मला जन्म का दिला?

खरे तर अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांनी एकदा वडिलांना विचारले होते की, ‘तुम्ही मला जन्म का दिला?’ हा प्रश्न नक्कीच थोडा कठीण आहे पण हरिवंशराय बच्चन यांनी आपल्या मुलाच्या या प्रश्नाचे उत्तर अतिशय मनोरंजक पद्धतीने दिले. त्यांनी एक कविता लिहिली होती, ज्यामध्ये त्यांनी हा प्रश्न आगामी काळातही तसाच राहणार असल्याचे म्हटले होते.

“जिंदगी और जमाने की कशमकश से घबराकर मेरे बेटे मुझसे पूछते हैं कि हमें पैदा क्यों किया था?
और मेरे पास इसके सिवाय कोई जवाब नहीं है कि मेरे बाप ने मुझसे बिना पूछे मुझे क्यों पैदा किया था?
और मेरे बाप को उनके बाप ने बिना पूछे उन्हें और उनके बाबा को बिना पूछे उनके बाप ने उन्हें?
जिंदगी और जमाने की कशमकश पहले भी थी,
आज भी है शायद ज्यादा…कल भी होगी, शायद और ज्यादा…तुम ही नई लीक रखना,
अपने बेटों से पूछकर उन्हें पैदा करना।”

 

View this post on Instagram

 

हरिवंशराय बच्चन आणि अमिताभ बच्चन यांचा आणखी एक किस्सा खूप लोकप्रिय आहे, ज्यामध्ये काळाचे चक्र दाखवले आहे. हरिवंशराय बच्चन हे प्रसिद्ध कवी आहेत. पण एकेकाळी ते कवी संमेलनांना पैसे मिळवण्यासाठी जात असत. जिथे त्यांना 500 ते 1000 रुपये मिळत होते. हे काम उरकून घरी परतायला पहाटे 3-4 वाजायचे. मग अमिताभ बच्चन नेहमी वडिलांना विचारायचे की ते घरी उशिरा का येतात?

ज्यावेळी अमिताभ बच्चन यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले तेव्हा तेही दोन-तीन शिफ्टमध्ये काम करायचे. अनेकवेळा ते सकाळी सहा वाजताही घरी पोहोचले आहेत. यावेळी हरिवंशराय बच्चन आपल्या मुलाला म्हणायचे की बेटा, ‘काय ही वेळ आहे का येण्याची.’ त्यावेळी बिग बी देखील वाडीलांच्या उत्तराची पुनरावृत्ती करायचे की, ‘बाबूजीं पैसे मोठ्या कष्टाने मिळतात.’

अमिताभ बच्चन सतत ‘कोन बनेगा करोड़पति’ या कार्यक्रमाच्या मांचावर सतत ते आपल्या वडीलांवविषयी काही रंजक किस्से सांगत असतात.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
फटाके वाजवा रे! ‘गुलक’च्या मिश्रा कुटुंबातील धाकट्या मुलाचे प्रेयसीसोबत झाले लग्न
काय होतं नेमकं ‘त्या’ लॉकेटमध्ये, बप्पी लहरींनी सांगितला रंजक किस्सा

हे देखील वाचा