Friday, April 19, 2024

प्रसिद्ध अभिनेता अडकला लग्न बंधनात, सुंदर पत्नीसाेबत शेअर केला फाेटाे

वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणारा आणि ‘आय अॅम कलाम’ या प्रसिद्ध चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झालेला अभिनेता हर्ष मायर 25 नोव्हेंबरला विवाहबंधनात अडकला. त्याने त्याची प्रेयसी सुकन्या राजन हिच्याशी लग्न केले आहे. हर्षने इंस्टाग्रामवर आपल्या लग्नाचा एक अतिशय सुंदर फोटो शेअर करून याबाबत माहिती दिली आहे.

अभिनेता हर्ष मायर (harsh mayar) याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर लग्नाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, अभिनेत्याने गुलाबी रंगाची शेरवानी घातली आहे आणि त्याच्या पत्नीने गुलाबी रंगाचा लेहेंगा घातला आहे, ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. लग्नात कपलने मॅचिंग आउटफिटसोबत बॅकग्राउंड गुलाबी ठेवला होता. या फोटोत सुकन्या राजन पती हर्ष मेयरच्या गालावर चुंबन घेताना दिसत आहे आणि हर्षच्या चेहऱ्यावर हसू दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Harsh Mayar (@haanjiharsh)

हर्षने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये हर्ष आणि सुकन्या खूप आनंदी दिसत आहेत. हर्षने फोटो अपलोड केल्यानंतर अनेक सिनेतारकांनी आणि त्याच्या चाहत्यांनी त्याला त्याच्या नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्रसिद्ध अभिनेते राजेश तैलंग यांनीही या जोडप्याचे अभिनंदन केले आहे. चाहते त्यांना सुखी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा देत आहेत.

हर्ष मायरच्या काराकिर्दी विषयी बाेलायचे झाले, तर त्याने प्रसिद्ध वेब सीरिज ‘गुलक’मध्ये काम केले आहे. हर्ष या मालिकेत मिश्रा कुटुंबातील लहान मुलाची भूमिका साकारत आहे. ‘गुलक’च्या तिन्ही सीजनमधील हर्षची व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. हर्षने एका शाळकरी मुलाच्या व्यक्तिरेखेने प्रेक्षकांची मने जिंकली. हर्षच्या लग्नाची बातमी ऐकल्यानंतर त्याच्या चाहत्यांना विश्वास बसत नाही आहे की, पडद्यावर किशोरवयीन मुलाची भूमिका साकारणाऱ्या हर्षने आता लग्न केले आहे. चाहते त्याचे मनापासून अभिनंदन करत आहेत.(gullak fame actor harsh mayar ties knot with girlfriend sukanya rajan see beautiful pic)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
महाभारत फेम अभिनेता पुनीत इस्सर यांचे ईमेल आयडी हॅक, तब्बल 13 लाखांना लागला असता चुना

ज्याच्या स्टाईलवर आख्खं जग होतं फिदा, तोच मायकल जॅक्सन गायचा बप्पी दांचे गोडवे; म्हणालेला…

हे देखील वाचा