सलमान खानचा ‘बजरंगी भाईजान’ हा सिनेमा आजही कोणीच विसरू शकलेले नाही. या सिनेमाने सलमान खानला एक मोठी आणि वेगळी ओळख दिली. त्याच्या अभिनयाचा एक वेगळाच पैलू या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळाला. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तर बक्कळ कमाई केली शिवाय रसिकांची मने देखील जिंकली. आजही हा सिनेमा जेव्हा जेव्हा टीव्हीवर लागतो तेव्हा तेव्हा सर्वच लोकं आवर्जून चित्रपट बघतात. सिनेमात सर्वच प्रकारच्या भावना अतिशय प्रभावीपणे मांडल्या गेल्यामुळे सिनेमा लगेच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेण्यात यशस्वी झाला. या सिनेमामुळे सलमानच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली.
या सिनेमामध्ये सलमानसोबतच अजून एका चेहऱ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते आणि हा चेहरा होता ‘मुन्नी’चा. एका मुक्या मुलीची भूमिका साकारणाऱ्या हर्षाली मल्होत्रा या बाल कलाकाराने अमाप लोकप्रियता मिळवली. निरागस चेहरा, बोलके डोळे, स्मितहास्य असलेल्या हर्षालीने सर्वांचेच मनं जिंकून घेतले. चित्रपटात एकही संवाद न बोलता केव्हा चेहऱ्याच्या एक्सप्रेशनवरून तिने अप्रतिम अभिनय केला होता. हर्षालीला तिच्या अभिनयाबद्दल अनेक पुरस्कार देखील मिळाले. आज हीच मुन्नी मोठी झाली असून तिच्यात खूपच फरक पडला आहे. आज (३ जून) हर्षाली तिचा १३ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने जाऊन घेऊया हर्षालीबद्दल अनेक न लक्षवेधी गोष्टी.
हर्षालीचा जन्म ३ जून २००८ साली झाला. तिच्या आईचे नाव काजल मल्होत्रा असून, हर्षाली मूळची दिल्लीची आहे. मात्र तिच्या अभिनयात एन्ट्रीनंतर तिचे कुटुंब मुंबईमध्ये आले. हर्षाली मुंबईच्या सेवन स्क्वायर अकॅडमीमध्ये शिकते. हर्षाली केवळ २१ महिन्यांची होती जेव्हा तिने पहिल्यांदा कॅमेरा फेस केला होता. बजरंगी भाईजान सिनेमाआधी तिने अनेक मालिका आणि जाहिरातींमध्ये काम केले आहे. हर्षाली टीव्हीवर ‘कुबूल है’ आणि ‘लौट आओ तृषा’ या मालिकांमध्ये दिसली होती. सलमान खानच्या बजरंगी भाईजान सिनेमाआधी तिने सलमानचाच ‘प्रेम रतन धन पायो’ सिनेमा साईन केला होता. मात्र बजरंगी भाईजान सिनेमातील तिची भूमिका मोठी आणि महत्वाची असल्याने तिने ‘प्रेम रतन धन पायो’ सिनेमा सोडला आणि बजरंगी भाईजान साईन केला.
बजरंगी भाईजान सिनेमात अतिशय साधी दिसणारी हर्षाली खऱ्या आयुष्यात खूपच स्टायलिश आणि ग्लॅमरस आहे. ती सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असून, तिला आखो लोकं फॉलो करतात. तिचे फोटो आणि व्हिडिओ लगेच व्हायरल होतात. बजरंगी भाईजान सिनेमात जरी हर्षालीने मुक्या मुलीची भूमिका साकारली असली तरी खऱ्या आयुष्यात ती खूपच बोलकी आहे. बजरंगी भाईजान सिनेमात काम करताना ती केवळ ७ वर्षाची होती. शुटिंगवेळी ती जेव्हा जेव्हा सलमानला रडताना किंवा फाइट सीन करताना पाहायची तेव्हा तेव्हा ती सेटवर खूपच रडायची. तेव्हा स्वतः सलमान तिला समजवायचा.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा