Wednesday, February 4, 2026
Home बॉलीवूड एकेकाळी कुरिअर बॉय म्हणून केले जॉनला हेल्मेट डिलिव्हर; आता त्याच्याच चित्रपटात काम करणारंय ‘हा’ अभिनेता

एकेकाळी कुरिअर बॉय म्हणून केले जॉनला हेल्मेट डिलिव्हर; आता त्याच्याच चित्रपटात काम करणारंय ‘हा’ अभिनेता

या ग्लॅमर जगात कधी काय होईल याचा काहीच भरवसा नाही. येणारा प्रत्येक दिवस रोज वेगळे काहीतरी घेऊन येतो. आपल्या मेहनतीच्या जोरावर आपण शून्यातून विश्व निर्माण करू शकतो. चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर अनेक कलाकारांनी या जगात त्यांचे स्वतःचे पक्के स्थान निर्माण केले आहे. अशी अनेक उदाहरण आपल्याला देता येतील. यश मिळवण्याआधी अनेक लहान- लहान काम करून उदरनिर्वाह करणारे कलाकार आज मोठे कलाकार झाले आहे. याचेच एक उदाहरण म्हणजे अभिनेता मॉडेल हर्षवर्धन राणे.

‘सनम तेरी कसम’ सिनेमात आपल्या अभिनयाचा डंका वाजणारा हर्षवर्धन सध्या ‘हसीन दिलरुबा’ सिनेमामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. या सिनेमात त्याचा हॉट आणि आकर्षक अंदाज सध्या सर्वानाच आवडत आहे. हर्षवर्धनने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये काही गोष्टींचा खुलासा केला आहे.

हर्षवर्धनचा ‘हसीन दिलरुबा’ सिनेमा सध्या सर्वत्र गाजत असतानाच तो लवकरच जॉन अब्राहमच्या चित्रपटात झळकणार आहे. त्याचा आगामी सिनेमा जॉन प्रोड्युस करणार आहे. हर्षवर्धने या मुलाखतीमध्ये सांगितले की, या क्षेत्रात येण्याआधीच त्याची जॉनसोबत भेट झाली आहे. हर्षवर्धन जेव्हा कुरिअर बॉय म्हणून काम करायचा, तेव्हा त्याची आणि जॉनची भेट झाली होती.

हर्षवर्धनने या मुलाखतीमध्ये जॉनबद्दल सांगितले की, “जॉन सरांसमोर मी नेहमी नर्व्हस होतो. २००४ साली जेव्हा मी कुरिअर बॉय म्हणून काम करायचो, तेव्हा मी जॉन सरांना त्यांचे हेल्मेट डिलिव्हर केले होते. त्यावेळी त्यांना बघून मला जे वाटले, तेच आजही त्यांना पाहून मला वाटते. आज ते माझ्या चित्रपटाचे निर्माते आहेत. ते जेव्हा कधी माझ्या खांद्यावर हात ठेवतात, तेव्हा मी नर्व्हस होतो. मी विचार करतो की, अरे यांचा हात केव्हा बाजूला होईल आणि मी मागे सरकायला लागतो.”

हर्षवर्धन पुढे म्हणाला की, “आजही त्यांच्यासाठी माझ्या तोंडून सरच निघते. ते नेहमी म्हणतात, ‘सर नको म्हणू.’ मात्र, माझ्याकडून तसे काहीच होत नाही. कारण मी त्यांना तेव्हा भेटलो होतो, जेव्हा मी डोक्याला तेल लावायचो, चेहऱ्यावर पिंपल, घाणेरडी जुनी गाडी घेऊन कुरिअर डिलिव्हरी करायचो. आज ते माझ्या सिनेमाचे निर्माते आहेत. मी त्यांच्यासमोर मोकळे होण्याचा प्रयत्न करतो. मात्र, ते माझ्याकडून शक्य होत नाही.”

हर्षवर्धनने दाक्षिणात्य चित्रपटांमधून त्याच्या करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने ‘सनम ‘तेरी कसम’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. शिवाय तो अनेक जाहिरातींमध्ये देखील दिसत असतो.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भारीच ना! मिलिंद सोमण यांच्या लग्नाला तीन वर्षे पूर्ण; रोमँटिक फोटो शेअर करून दिल्या पत्नीला शुभेच्छा

-अली गोनीकडे सध्या नाहीये कोणताच प्रोजेक्ट; वाढलेलं वजन आहे का यामागचं कारण??

-‘मी अंतर्वस्त्र घालायचे की नाही, ही माझी चॉईस…’, कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्यांना हेमांगी कवीने दिली जोरदार चपराक

हे देखील वाचा