Thursday, June 1, 2023

हरियाणाच्या डान्सिंग क्विनला बालपणी नव्हता नृत्यात रस, सपना चौधरीचे ‘हे’ आहे खरे नाव

हरियाणाची डान्सिंग क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेली सपना चौधरी (Sapana Choudhary) अनेकदा तिच्या डान्सद्वारे सोशल मीडियावर अधिराज्य गाजवत असते. तिचा डान्स आवडणाऱ्या लोकांची संख्या काही कमी नाही. त्यामुळेच सपनाचे व्हिडिओ दररोज व्हायरल होत असतात. डान्सशिवाय सपना चौधरी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा सोशल मीडियामध्ये चर्चेत असते. पण, सपना चौधरीचे खरे नाव काय आहे हे तुम्हाला माहीत आहे का? आपल्या डान्सने आणि स्टाइलने करोडो लोकांना वेड लावणाऱ्या सपना चौधरीचे खरे नाव तुम्हाला क्वचितच माहित असेल, जाणून घेऊया सपनाच्या आयुष्यातील हे माहित नसलेले किस्से.

हरियाणातील लोकांची मने जिंकल्यानंतर सपना चौधरीने ‘बिग बॉस-11’ या रिअलिटी शोमध्ये भाग घेतला आणि ज्यामुळे ती देशभरात चर्चेत आली होती. सपनाने आपल्या डान्स आणि ठुमक्याने सर्वसामान्यांनाच नाही तर बॉलिवूड स्टार्सनाही वेड लावले आहे. पण, हे जाणून आश्चर्य वाटेल की सपना चौधरीचे खरे नाव सपना नसून सुषमा आहे. पण, डान्सर म्हणून प्रवास सुरू करण्यापूर्वी तिने तिचे नाव बदलून सपना असे ठेवले आणि आज ती त्याच नावाने ओळखली जाते.

सपना चौधरी खूप संघर्ष करून इथपर्यंत पोहोचली आहे. ती अवघ्या 11 वर्षांची असताना तिच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. बालपणीच वडिलांचे छत्र हरवल्याने सपनाला मोठा संघर्ष करावा लागला. तिच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर ते बराच काळ आजारी राहिले आणि त्यानंतर त्यांनी जगाचा निरोप घेतला. वडिलांच्या निधनानंतर सपनाच्या घरात आर्थिक संकट आले आणि तिला घराची जबाबदारी बळजबरीने उचलावी लागली. या घटनेनंतर सपनाचे इन्स्पेक्टर होण्याचे स्वप्न भंगले आणि ती देसी क्वीन बनली.

हरियाणातील नजफगढ येथे जन्मलेल्या सपनाने वडिलांच्या निधनानंतर घर चालवण्यासाठी नृत्य सुरू केले, त्यानंतर तिचा अभ्यास अर्ध्यावरच थांबला. तिने फक्त आठवीपर्यंतच शिक्षण घेतले आणि त्यानंतर स्टेजवर नृत्य सादर करण्यास सुरुवात केली. सपनाचा प्रवास खऱ्या अर्थाने इथून सुरू झाला. आज ती देशभरातील सर्वात लोकप्रिय डान्सर म्हणून सपना आज प्रसिद्ध आहे.

हे देखील वाचा