Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

आनंदाची बातमी! ‘हसीन दिलरुबा’ फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात; फोटो होतायत जोरदार व्हायरल

बॉलिवूडमधून एकापाठोपाठ एक आनंदाच्या बातम्या येत आहेत. सध्या लग्नाचा हंगाम सुरू आहे, असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. कारण बॉलिवूड कलाकार लग्नाच्या बेडीत अडकत आहेत. अभिनेता फरहान अख्तर आणि त्याची गर्लफ्रेंड शिबानी दांडेकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. अशातच आता ‘हसीन दिलरुबा’ फेम अभिनेता विक्रांत मेस्सीही बोहल्यावर चढला आहे. सध्या त्याच्या लग्नाचे फोटो जोरदार व्हायरल होत आहेत.

अभिनेता विक्रांत मेस्सीने (Vikrant Massey) शुक्रवारी (१८ फेब्रुवारी) आपली गर्लफ्रेंड शीतल ठाकूरसोबत (Sheetal Thakur) लग्नगाठ (Marriage) बांधली आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये विक्रांतने पांढऱ्या रंगाची शेरवानी आणि गुलाबी पगडी परिधान केली होती. दुसरीकडे शीतलने लाल रंगाचा लेहंगा परिधान केला होता. एका फोटोत ती मंडपामध्ये बसल्याचे दिसत आहेत.

यापूर्वी विक्रांत आणि शीतल यांच्या हळदी समारंभाचा एक व्हिडिओ त्याच्या एका फॅन क्लबने शेअर केला होता. त्याच्या चेहऱ्यावर हळदीचा लेप लावून देसी गर्ल गाण्यावर जोरदार डान्सही केला होता. त्यानंतर त्यांनी एकमेकांची गळाभेटही घेतली.

विक्रांत आणि शीतल यांनी अल्ट बालाजीच्या ‘ब्रोकन बट ब्युटीफूल’ या वेबसीरिजच्या पहिल्या पर्वात काम केलं होतं. त्यानंतर त्यांनी २०१९ सालीच साखरपुडा उरकला होता. मात्र, कोरोना व्हायरसमुळे त्यांच्या लग्नाला इतका उशीर झाला.

आई- वडिलांना लावायचं होतं विक्रांतचं लग्न
मागील वर्षी माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीत विक्रांत म्हणाला होता की, तो यापूर्वीच शीतलसोबत लग्नाच्या बेडीत अडकला असता. मात्र, महामारीने घोळ घातला. त्याचे लग्न लावणे आई-वडिलांची इच्छा आहे का? असे विचारले असता तो म्हणाला की, तो आपल्या आयुष्यात खूपच व्यस्त आहे. तो मजेत म्हणाला की, “लेका लग्नात कधी यायचंय फक्त तेवढं सांग.”

विक्रांतच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने टीव्हीवरील ‘धूम मचाओ धूम’, ‘बालिका वधू’ आणि ‘धरम वीर’ यांसारख्या मालिकांमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्याने ‘लुटेरा’ सिनेमा सहाय्यक भूमिकेसोबत बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. त्यानंतर त्याने ‘छपाक’, ‘हसीन दिलरुबा’ आणि ‘गिन्नी वेड्स सनी’ यांसारख्या सिनेमातही आपल्या अभिनयाची झलक दाखवली. तो ‘मिर्झापूर’, ‘मेड इन हेव्हन’ आणि ‘क्रिमिनल जस्टिस’ यांसारख्या वेबसीरिजमध्येही झळकला आहे.

हेही पाहा- यूट्यूबवर राज्य करणारी भारतातील पोरं, ‘या’ यूट्यूबर्सचा नाद करायचा न्हाय 1

आता तो लवकरच झी५ च्या ‘लव्ह हॉस्टेल’ या सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा ऑनर किलींग विषयावर आधारित आहे. यात त्याच्यासोबत सान्या मल्होत्रा आणि बॉबी देओल यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

हे देखील वाचा