Thursday, March 28, 2024

‘माणसं की निसर्ग’ असा प्रश्न निर्माण करणाऱ्या ‘हाथी मेरे साथी’ सिनेमाचा भव्य ट्रेलर प्रदर्शित

इरॉस नाऊने नेहमीच आपल्या दर्शकांसाठी उत्कृष्ट ब्लॉकबास्टर अशा कलाकृती सादर केल्या आहेत. आपल्या उत्कृष्ट आणि वेगवेगळ्या कल्पनांच्या जोरावर त्यांनी नेहमीच प्रेक्षकांना आकर्षित केले आहे. इरोस नाऊने काही महिन्यांपूर्वीच बहुप्रतिक्षित चित्रपट ‘हाथी मेरे साथी’ प्रदर्शित करण्याची घोषणा केली होती. चाहतेसुद्धा या चित्रपटाची बऱ्याच काळापासून वाट पाहत होते. मात्र लॉकडाऊनमुळे चित्रपटगृह बंद असल्याने या सिनेमाचे प्रदर्शन लांबणीवर गेले होते.

आघाडीच्या ओटीटी प्लॅटफॉर्मने या चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित केला आहे. या सिनेमाचा ट्रेलर अतिशय भव्य आणि आकर्षक असून, तो प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी झाला आहे. १८ सप्टेंबर २०२१ रोजी इरॉस नाऊ प्लॅटफॉर्म आणि झी सिनेमावर हा चित्रपट एकाचवेळी प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा हिंदी, तामिळ आणि तेलगू अशा ३ भाषांमध्ये प्रदर्शित होत असून, असे सांगितले जात आहे की, हा चित्रपट पर्यावरण कार्यकर्ते जादव यांच्यावर आधारित आहे. जादव यांना २०१५ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आले होते.

चित्रपटाच्या घोषणेपासूनच सिनेमाबद्दलच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. या चर्चांमध्ये चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद आणि सोशल मीडियावर मिळणाऱ्या सर्व कमेंट्स लक्षात घेऊन निर्मात्यांनी हा चित्रपट जगभरात प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म इरॉस नाऊवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी गणेश चतुर्थी असलेल्या महिन्यापेक्षा दुसरा कोणताच उत्तम महिना नाही. त्यासाठीच हा सिनेमा सप्टेंबरमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे.

या चित्रपटाचे मुख्य आकर्षण म्हणजे राणा दग्गुबती. राणाचा या सिनेमातील लूक आणि त्याचा अंदाज त्याच्या फॅन्ससोबतच इतरांचेही लक्ष वेधून घेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभु सोलोमन यांनी केले आहे. या ऍक्शन चित्रपटात राणा दग्गुबाती आणि पुलकित सम्राट यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. श्रिया पिळगावकर आणि झोया हुसेन देखील चित्रपटात सहाय्यक भूमिकेत दिसणार आहेत.

चित्रपटाच्या ट्रेलर लाँन्चवेळी राणा म्हणाला की, “या चित्रपटाने मला एक चांगली व्यक्ती बनण्यास मदत केली आहे. मला हा चित्रपट करताना अभिमान वाटत आहे. या चित्रपटाद्वारे आम्हाला सांगायचे आहे की‌, हत्तींसाठी शहरीकरणाचे काय नुकसान आहे.” राणाने २०१० मध्ये ‘लीडर’ सिनेमातून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली.

बॉलिवूडमध्ये राणाने ‘डिपार्टमेंट’,‘ द गाझी अटॅक’, ‘वेलकम टू न्यूयॉर्क’, ‘हाऊसफुल्ल ४’, ‘बेबी’ आदी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. या वर्षी फक्त राणाचा ‘हाथी मेरे साथी’ हा चित्रपट प्रदर्शित होणारा आहे. यानंतर, २०२२ मध्ये राणा ‘भीमला नायक’ चित्रपटात दिसणार आहे. राणा व्यतिरिक्त पवन कल्याण, नित्या मेनन आणि ऐश्वर्या राजेश या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत.

 

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-दुःखद! मल्याळम अभिनेता रिजाबावा यांचे दीर्घ आजाराने झाले निधन

-सिद्धार्थच्या निधनानंतर ॲडमिट झाली होती जसलीन, नवीन व्हिडिओमुळे पुन्हा झाली ट्रोल

-Bigg Boss OTT: ‘राकेश तालावर नाचणारा नाहीये’, काम्या पंजाबीने साधला शमिता शेट्टीवर जोरदार निशाणा

हे देखील वाचा