बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते सिद्धार्थ रॉय कपूर (siddharth roy kapoor) याला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. सिनेअभिनेत्री विद्या बालनचा (vidya balan) पती सिद्धार्थ रॉय कपूर हा देखील एक यशस्वी उद्योगपती आहे. आज त्याचा वाढदिवस आहे. २ ऑगस्ट १९७४ रोजी मुंबईत जन्मलेला सिद्धार्थ एका चित्रपट कुटुंबातील आहे. त्याची आई शालोमी रॉय कपूर माजी मिस इंडिया आहे. त्याला दोन भाऊ आहेत- कुणाल रॉय कपूर, आदित्य रॉय कपूर. दोघेही चित्रपट अभिनेते म्हणून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत.
तो रॉय कपूर फिल्म्सचे संस्थापक आहे. यासोबतच त्याने ‘पिहू’, ‘दंगल’, ‘सत्याग्रह’, ‘चेन्नई एक्स्प्रेस’, ‘हिरोईन’, ‘बर्फी’ आदी अनेक यशस्वी चित्रपटांची निर्मिती केली आहे. सिद्धार्थने आपल्या करिअरची सुरुवात इंटर्न म्हणून केली होती पण आज तो कोट्यवधींचा मालक आहे.
सिद्धार्थ रॉय कपूरची पहिली नोकरी यूटीव्हीमध्ये होती. ही गोष्ट 1994 सालची आहे. त्यावेळी ही कंपनी रॉनी स्क्रूवाला यांच्या हातात होती. सिद्धार्थने येथे इंटर्न म्हणून अर्ज केला. त्याला महिन्याला 2000 रुपये मिळू लागले. रॉनी स्क्रूवाला यांच्यासोबत त्यांनी कंपनीला पुढे नेण्याशी संबंधित धोरणात काम केले. त्यानंतर एमबीए केले. एमबीएनंतर सिद्धार्थने प्रॉक्टर अँड गॅम्बलमध्ये प्रवेश घेतला आणि त्यानंतर स्टार टीव्हीच्या हाँगकाँगच्या कार्यालयात काम करण्यास सुरुवात केली. येथे तो स्टार संघाच्या सर्वात तरुण उपाध्यक्षांपैकी एक बनला.
यानंतर रॉनी स्क्रूवालाने स्वत: त्याला पुन्हा यूटीव्ही जॉईन करण्यासाठी बोलावले. सिद्धार्थने परत येऊन ‘रंग दे बसंती’ आणि ‘खोसला का नेस्ता’ सारख्या चित्रपटांच्या मार्केटिंगमध्ये काम केले. हंगामा टीव्हीच्या यशात सिद्धार्थचाही महत्त्वाचा वाटा असल्याचं म्हटलं जातं. यातून त्याने डिस्ने चॅनलला तगडी स्पर्धा दिली. दरम्यान, सिद्धार्थने यूटीव्ही मोशन पिक्चर्समध्ये विपणन तसेच वितरण आणि महसूल निर्मितीमध्ये सामील झाला. २००८ मध्ये ते कंपनीचे सीईओ बनले. त्याच्या आगमनामुळे UTV Motion Pictures ला मिळालेला नफा आता एक उदाहरण बनला आहे.
विद्या बालन ही सिद्धार्थ रॉय कपूरची तिसरी पत्नी आहे. सिद्धार्थने त्याची बालपणीची मैत्रिण आरती बजाजसोबत पहिले लग्न केले. मात्र, हे लग्न फार काळ टिकले नाही आणि दोघांनीही एकमेकांना घटस्फोट दिला. आरती बजाजनंतर सिद्धार्थने टीव्ही प्रोड्यूसर कवितासोबत लग्न केले. त्यांचे लग्नही यशस्वी झाले नाही आणि २०११ मध्ये कविता आणि सिद्धार्थने घटस्फोट घेतला आणि वेगळे झाले. यानंतर सिद्धार्थचे मन विद्यावर जडले. विद्याला लग्नाला राजी करण्यासाठी सिद्धार्थला खूप मेहनत घ्यावी लागली.
विद्या बालन आणि सिद्धार्थ रॉय कपूर यांची पहिली भेट फिल्मफेअर अवॉर्ड्सच्या बॅकस्टेजवर झाली होती. यानंतर करण जोहरनेही दोघांना भेटायला लावले. करण जोहर हा दोघांचा कॉमन फ्रेंड आहे. सिद्धार्थ आणि विद्या दोघेही चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध होते, त्यामुळे बाहेर फारसे भेटणे शक्य नव्हते. त्यामुळेच दोघींची भेट कमी, पण बोलणे जास्त होते. अशातच दोघांची जवळीक हळूहळू वाढत गेली. विद्याने १४ डिसेंबर २०१२ रोजी सिद्धार्थसोबत ७ फेरे घेतले. मुंबईतील वांद्रे भागात ग्रीन गिफ्ट नावाच्या बंगल्यात दोघांनी लग्न केले होते. एका खाजगी समारंभात त्यांचे लग्न झाले होते, ज्यामध्ये फक्त दोन्ही कुटुंबातील सदस्य आणि काही जवळचे मित्र उपस्थित होते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आता शोध मोहीम चालू!, ‘बॉईज ३’ च्या मोशन पोस्टरमध्ये दिसणारी ‘ती’ बोल्ड अभिनेत्री नक्की कोण?
‘माझे प्रेम नव्हतेच ती मला फुकटात मिळाली’, सुदेश लहरीचा पत्नीबाबत मोठा खुलासा