Friday, May 24, 2024

बाबो! विद्या बालनने शेअर केले बेडरुम सिक्रेट; म्हणतेय, ‘मला सेक्स केल्या केल्या…’

विद्या बालन (Vidya Balan) ही हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि सोज्वळ सौंदर्याने तिने सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. विद्या बालन जितकी तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते. तितकीच ती तिच्या बोल्ड आणि बिंधास्त वक्तव्यासाठीही प्रसिद्ध आहे. निर्माता करण जोहरच्या कॉफी विथ करण कार्यक्रमात तिने तिचे बेडरुम सिक्रेट सांगत सर्वांनाच धक्का दिला होता. काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊ. 

बॉलिवूड निर्माता करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’ हा कार्यक्रम चांगलाच लोकप्रिय आहे. या कार्यक्रमात अनेक कलाकारांना आमंत्रित केले जाते. या कार्यक्रमाचे आत्तापर्यंतचे सर्वच सिझन सुपरहीट ठरले असून , सध्या कॉफी विथ करणचा ७ वा सीझन चांगलाच चर्चेत आहे. परंतु याआधीचे अनेक सीझनही प्रेक्षकांमध्ये चांगलेच लोकप्रिय ठरले होते. यांमध्ये अभिनेत्री विद्या बालनने तिच्या बिनधास्त अंदाजात दिलेली उत्तरे पाहून प्रेक्षकही चकित झाले होते.

यावेळी कार्यक्रमात करण जोहरने विद्या बालनला अनेक खासगी प्रश्न विचारले ज्यावर अभिनेत्रीनेही बिंधास्त उत्तरे दिली होती.यावेळी करण जोहरने विद्याला तुला बेडरुममध्ये कोणती लाईट आवडते? डार्क की मंद असे विचारले होते. या प्रश्नाचे उत्तर देताना तिने मला बेडरुममध्ये मंद प्रकाश आवडतो असे सांगितले होते. त्यानंतर करण जोहरने तिच्या बेडशीटसोबतच अनेक खासगी प्रश्न विचारले ज्यावर विद्या बालनने मनमोकळी उत्तरे दिली होती.

सर्वांना आश्चर्याचा धक्का तर तेव्हा बसला जेव्हा करण जोहरने विद्या बालनला सेक्स झाल्यानंतर तु पहिल्यांदा काय करतेस? असा अत्यंत खासगी प्रश्न विचारला होता. यावर विद्या बालननेही मला सेक्स पुर्ण झाल्यानंतर पहिल्यांदा पाणी प्यावे लागते कारण तहान भागवता भागवता मलाच तहान लागते अशी धक्कादायक प्रतिक्रिया दिली होती. या एपिसोडनंतर विद्या बालनची सर्वत्र जोरदार चर्चा पाहायला मिळाली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हे देखील वाचा