Wednesday, February 21, 2024

श्रेयस तळपदे आणि महेश मांजरेकर पहिल्यांदाच एकत्र १ मार्चला प्रदर्शित होणार ‘ही अनोखी गाठ’

महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) मुव्हिज आणि झी स्टुडिओज निर्मित, महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘ही अनोखी गाठ’ या चित्रपटाची नुकतीच सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली आहे. यात श्रेयस तळपदे आणि गौरी इंगवले यांच्या प्रमुख भूमिका असून या चित्रपटाची कथा, पटकथा महेश मांजरेकर यांचीच आहे तर चित्रपटाचे संवाद गणेश मतकरी यांचे आहेत. ‘ही अनोखी गाठ’ च्या निमित्ताने महेश मांजरेकर आणि श्रेयस तळपदे ही जोडी पहिल्यांदा एकत्र येत आहेत. हा चित्रपट १ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.

दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणतात, ‘झी स्टुडिओजसोबत या आधीही अनेकदा काम केले असून पुन्हा एकदा नवा चित्रपट घेऊन आलो आहे. श्रेयस आणि गौरी यांची केमिस्ट्री पाहणे औस्तुक्याचे ठरेल. हळूहळू चित्रपटातील गोष्टी समोर येतीलच.’’

झी स्टुडिओजचे बिझनेस हेड मंगेश कुलकर्णी म्हणतात, “झी स्टुडिओज नेहमीच प्रेक्षकांसाठी दर्जेदार चित्रपट घेऊन येत असते. झी स्टुडिओज आणि महेश मांजरेकर हे एक समीकरण झाले आहे. त्यामुळे यांच्यासोबत प्रेक्षकांसाठी एक आगळीवेगळी प्रेमकहाणी घेऊन येण्यास आम्ही सज्ज झालो आहोत.”

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

पूनम पांडेच्या मृत्यू स्टंटवर भडकले IFTDA अध्यक्ष अशोक पंडित; म्हणाले, ‘तिच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे..’
पूनम पांडेच्या मृत्यूच्या पब्लिसिटी स्टंटने लोकांचा संताप; म्हणाले, ‘शेम ऑन यू पूनम..’

हे देखील वाचा